mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पारणं फेडलं! सिकंदर शेख ठरला भीमा केसरीचा मानकरी; एकचाक डावावर पंजाबच्या दिनेश गोलियावर मात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 9, 2024
in मनोरंजन
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

टीम मंगळवेढा टाईम्स ।

प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान, प्रचंड उत्कंठा, टाळ्या अन् हलग्यांच्या कडकडाटात टाकळी सिकंदरच्या भीमा केसरी कुस्ती मैदानात मोहोळच्या पैलवान सिकंदर शेख याने पंजाबच्या उंच्यापुऱ्या पैलवान प्रदीपसिंग जिरगपूरला एकचाक डावावर आस्मान दाखवत भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली.

तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत पंजाबच्या पै. दिनेश गोलियावर विजय मिळविला. या दोन्ही मल्लांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फेडलं.

१८ ते २० मिनिटे सुरू असलेली ही कुस्ती चांगलीच रंगली. सिकंदरने प्रदीपसिंगला एकचाक डावावर आस्मान दाखवत भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली. याशिवाय भीमा कामगार केसरी कुस्ती पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल भुंदू यांच्यात झाली. त्यात पृथ्वीराज पाटील विजयी झाला.

भीमा सभासद केसरी किताबासाठी माऊली कोकाटे विरुद्ध गुरजीत मारगोड यांच्यात लहन याली या कुस्तीपटू माऊली कोकाटे गुणांवर विजय झाला. भीमा साखर केसरीसाठी झालेल्या लढतीत महेंद्र गायकवाड याने सिंगल नेल्सन डावावर दिनेशला अस्मान दाखवत कुस्ती जिंकली.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार यशवंतराव माने, ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील, भाजपचे संघटक धैर्यशील मोहिते-पाटील, प्राचार्य बी. पी. रोंगे, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, मंगलताई महाडिक, अरुंधती महाडिक, वैष्णवी महाडिक,

भाजपचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख, पृथ्वीराज माने, विराज आवताडे, समाधान काळे, भाजपचे नेते शंकरराव वाघमारे, अंकुश आवताडे, सुशील क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, लतीफ तांबोळी, सरपंच विश्वास महाडिक, भीमाचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे आदी उपस्थित होते.

अशोक धोत्रे, धनाजी मदने आणि पांडुरंग ताटे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटच्या कुस्तीचे पंच म्हणून खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रकुल पदक विजेते राम सारंग आणि अफसर शेख यांनी काम पाहिले

४०० मल्लांची हजेरी; १५ लाखांची बक्षिसे

भीमा कारखान्याचे संस्थापक कै. भीमराव महाडिक यांच्या स्मृतिदिन आणि खा. धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भीमा कारखान्याच्यावतीने चेअरमन विश्वराज महाडिक 5 यांनी भीमा केसरी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत सोलापूर जिल्हा व महाराष्ट्रातील जवळपास ४०० मल्लांनी हजेरी लावली होती. या कुस्त्यांमध्ये भीमा केसरीची मानाची गदा उचलण्यासाठी महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख व पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर यांच्यात कुस्ती प्रेमींना खिळवून ठेवणारी प्रेक्षणीय दंगल झाली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भीमा केसरी

संबंधित बातम्या

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
Next Post
घराबाहेर पडू नका! पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी

शेतकरी चिंताग्रस्त! ढगाळ वातावरणामुळे फळबागांवर रोगराईची भीती, सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी तुरळक अवकाळी पाऊस; वातावरणाचा 'या' पिकांना धोका

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा