mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! सिताराम साखर कारखाना पहिला हप्ता २५०० रुपये प्रतिटन देणार; डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांची मोठी घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 31, 2023
in सोलापूर
शेतकऱ्यांनो! सिताराम साखर कारखाना पहिला हप्ता २५०० रुपये प्रतिटन देणार; डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर । राजेंद्र फुगारे

या वर्षी सितारामकडे गाळपास येणाऱ्या उसाला २५०० रुपये प्रति मेट्रिक टन पहिली उचल देणार आहे. अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे गाळपास आलेल्या उसाचे बिल मस्टरनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सिताराम साखर कारखानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड  यांनी सांगीतले आहे.

काल सिताराम साखर कारखानाचा ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांचे शुभहस्ते व धनश्री परिवारचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे तसेच चेअरमन प्रा.शोभा काळुंगे यांच्या उपस्थितीत मोळी पूजन व तेरावा गाळप हंगाम शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड बोलत होत्या.

२०२३-२४ गाळप हंगामासाठी मशिनरीचे आधुनिकीकरण केल्याने दररोज साधारणपणे ३५०० मे. टन ऊसाचे गाळप होणार आहे. कारखान्यात आधुनिक डिस्टीलरी प्रकल्प उभा करण्याचे काम हाती घेतले आहे.

तो लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबरीने ग्रीन हायड्रोजन इंधन निर्मितीचा प्रकल्प उभा करण्यात येणार असून हा प्रकल्प उभा करण्यामध्ये भारतातला पहिला कारखाना राहणार आहे. मागील गाळप हंगामात कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसास  २३०० रुपये प्रतिटन दर दिलेला असुन आणखी दिवाळी सणांसाठी १०० रुपये प्रति टन हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात येणार आहे. तसेच माफक दरात उस उत्पादकांना साखर वाटप करणार येणार आहे.

शासन निर्णयानुसार सिताराम कडील वजन काटे डिजिटल असुन शेतकऱ्यांनी आपला उस कोठेही वजन करुन घेवुन यावा त्यामध्ये कोणतीही तापवत पाहण्यास मिळणार नाही. कारखानदारीत दराच्या बरोबरीने चोख वजन काट्याची देखील स्पर्धा व्हायला हवी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, अनेक अडचणीतून हा कारखाना बाहेर काढला आहे. या हंगामासाठी मशिनरीचे आधुनिकीकरण केल्याने दररोज साधारणपणे ३५०० मे. टन ऊसाचे गाळप होणार आहे. या हंगामात ४ लाख मे. टन उस गाळप करण्याचे उद्दीष्ट आहे. शेतकरीवर्गाचे जगणे सुसह्य करण्यासाठी धनश्री व सिताराम परिवार झटत आहे.

शेतकरी, कामगार, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांच्या एकत्रित कामामधून येणारा सिझन हा नक्की यशस्वी होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य फळ त्यांना मिळणार आहे. तरी सर्व भागातील उस पुरवठा शेतक-यांनी त्यांचा जास्तीत जास्त उस चालु वर्षी सिताराम साखर कारखान्याला गाळपास देवुन सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले.

याप्रसंगी ह.भ.प.अ‍ॅड.जयवंत बोधले महाराज, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, महादेव देठे, डॉ. रमेश सिद, प्रा. ज्ञानेश्र्वर जाधव यांनी आपले मनोगते व्यक्त केली.

यावेळी यादाप्पा माळी, संचालक सुयोग गायकवाड, स्नेहल मुदगल, दिपाली पाटील, प्रकाश काळुंगे, डॉ.रविराज गायकवाड, प्रगतशिल बागायतदार शिवाजी घोडके,  दत्तात्रय सुर्यवंशी, सिमाताई काळुंगे, विठठलचे माजी संचालक उत्तम नाईकनवरे, बिभीषण ताड, अविनाश चव्हाण, कारखान्याचे कायदे सल्लागार शैलेश हावनाळे, संजय चौगुले,

धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे जनरल मॅनेजर रमेश फडतरे, चिफ इंजिनिअर एस. बी. रोंगे, प्रशासन अधिकारी डी. एम. सुतार, चिफ केमिस्ट व्ही. एस. नागणे, मुख्य शेती अधिकारी पी. जी. शिंदे, को – जन मॅनेजर ए. बी. गाजरे, सिव्हील इंजिनिअर आर. एस. वायदंडे,

पर्चेस व सेल्स मॅनेजर एन. पी. कोठावळे, पर्चेस ऑफीसर आर. एन. चेळेकर, स्टोअर किपर डी.जे. नागणे, ई.डी.पी. मॅनेजर टी.बी. पांढरे, फायनान्स अकौंटंट व्ही. एन. भोसले यांचेसह कारखान्यातील सर्व कर्मचारी, ऊस पुरवठा सभासद शेतकरी, तोडणी वहातुक कंत्राटदार व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जनरल मॅनेजर हणमंत पाटील यांनी केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सीताराम महाराज साखर कारखाना

संबंधित बातम्या

तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
भयंकर! अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून मंगळवेढ्यात तरुणाची आत्महत्या; व्याजाच्या पैशाच्या बदल्यात केली जमीनीची मागणी; तीघांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! भर चौकात मराठा तरुणाची आत्महत्या; मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध; पंढरपूर तालुक्यात घटना

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा