mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर प्रत्येक गावासाठी दोन उपसरपंच पद्धत लागू होणार? माजी सरपंचांची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 19, 2023
in राज्य
मोठी बातमी! अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ; दादासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? कुठले नेते फुटले? शपथ घेणाऱ्या ‘या’ आमदारांची यादी

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार यांच्यासह एकूण 9 जणांची मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान यावेळी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाले आहे.

दरम्यान याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजब मागणी केली आहे.

ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

वैजापुर तालुक्यातील मनूर येथील माजी सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी ही मागणी केली आहे.

राजीव साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जसे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांची निवड करू शकता,

त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच निवडीची परवानगी द्यावी.

गावाच्या विकासासाठी सरपंचाला समर्थन देण्यासाठी व त्यांच्याकडून गावाचे काम करून घेण्यासाठी उपसरपंच हा महत्त्वाचा असतो. आपण केलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या धर्तीवर आता गावाच्या भल्यासाठी दोन उपसरपंच निवड करता यावी. त्यामुळे यावर सकारात्मक चर्चा करून, कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी विनंती यावेळी निवेदनात करण्यात आली आहे.

राज्यात ज्याप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक गावात दोन उपसरपंच पदाची पद्धत लागू करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगरचे माजी सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे या मागणीचे निवदेन देखील त्यांनी ई-मेल द्वारे मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवला आहे.

तर मुख्यमंत्री कार्यालयाकडुन त्यांना उत्तर आले असून, सदर मागणी ही ग्रामविकास विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचा मेल त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या मागणीवर ग्रामविकास विभाग काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. मात्र या अजब मागणीची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

देशातील अनेक राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याचे उदाहरण आहे. मात्र याचा एक इतिहास देखील आहे. मुळात देशाच्या संविधानात उपमुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला नाही.

मात्र सत्तधारी पक्षातील किंवा आघाडीतील वाद मिटवण्यासाठी, नेत्याला संतुष्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद एक एवजी दोन दिले जातात. बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा यांची भारतातील पहिले उपमुख्यमंत्री म्हणून नोंद करण्यात आलेली आहे.

रजपूत समाजातून येणारे सिन्हा बिहारमधील काँग्रेसचे एक प्रमुख नेते समजले जात होते. 1967 नंतर काँग्रेसची एकहाती वर्चस्व कमी होत असल्याने अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात येत होते. त्यातच याचे पहिले बहुमान सिन्हा यांना मिळाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दोन उपसरपंच

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्त्व? ‘हम करे सो कायदा’ म्हणत मनमानी कारभार; प्रहार संघटनेचे राकेश पाटील यांचा थेट सरकारला सवाल

June 15, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

June 9, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Next Post
मंगळवेढेकरांनो गाड्या सांभाळा! पुन्हा एकदा चोरटयांनी बुलेट पळविली

धाडस! पाहुण्याची आणलेली मोटर सायकल चोरट्यानी हँड लॉक तोडून मंगळवेढ्यातून पळवली; अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात भरधाव कारचा थरार! यू-टर्न घेताना कारने दुचाकीला उडवले; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य

June 15, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मंगळवेढा पोलीस ठाण्यात मोठे फेरबदल! ५ कर्मचाऱ्यांची बदली, तर ५ नवीन अंमलदार रुजू; पहा कोणाची कुठे झाली बदली?

June 15, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

June 15, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्त्व? ‘हम करे सो कायदा’ म्हणत मनमानी कारभार; प्रहार संघटनेचे राकेश पाटील यांचा थेट सरकारला सवाल

June 15, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा