mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

MPSC टॉपर दर्शना पवार हत्याकांड; राहुल हंडोरे कसा पकडला? कुटुंबियांना किती वेळा फोन केले? धक्कादायक माहिती समोर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 28, 2023
in क्राईम, राज्य
धक्कादायक! वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झालेल्या दर्शना पवारच्या हत्येचं खरं कारण अखेर आलं समोर; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

एमपीएससीला राज्यात सहावी आलेल्या दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरेला पोलिसांनी अटक केली आहे. पाच दिवस फरार झालेल्या राहुल हंडोरेला पकडण्यात अखेर पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे.

या पाच दिवसात तो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर लपत फिरत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्याकडचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमधून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी तपासही सुरू केला आहे.

दर्शना पवारची हत्या केल्यानंतर राहुल महाराष्ट्राबाहेर फरार झाला होता. आधी तो सांगलीला गेला होता. त्यानंतर तो गोव्याच्या मारगोवा येथे गेला होता. नंतर तो चंदीगडलाही गेला. शेवटी तो पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला होता.

स्वत:चा पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार जागा बदलत होता. या प्रवासात त्याने फोन स्विच्ड ऑफ ठेवला होता. त्यामुळे त्याला पकडणं कठिण झालं होतं. पण तो मुंबईत आल्यानंतर त्याचा सुगावा लागला आणि त्याच्या मुसक्या बांधता आल्या, असं पुणे पोलिसांनी सांगितलं.

पकडणं कठिण

दर्शनाच्या हत्येनंतर फरार झाल्यावर राहुल हंडोरे सातत्याने कुटुंबीयांच्या संपर्कात होता. त्याने कुटुंबीयांना पाचवेळा फोन केला होता. तसेच संपूर्ण माहिती तो घेत होता. कुटुंबीयांना फोन करताना तो स्वत:च्या फोनवरून फोन करत नसायचा. प्रवासात एखाद्या प्रवाशाला विनंती करून त्याच्या फोनवरून तो कुटुंबीयांशी संपर्क साधायचा. त्यामुळे त्याला पकडणं कठिण झालं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.

अखेर तो पकडला

राहुल ज्या नंबरवरून कुटुंबीयांना फोन करायचा त्या नंबरवर आम्ही नंतर फोन करायचो. त्यावेळी संबंधित प्रवाशाकडून आम्हाला त्याची डिटेल्स मिळायची. मात्र, तो आमची पुढची स्टेप्स काय असणार आहे, याची माहितीही जाणून घ्यायचा. आम्ही त्याला पकडण्याचा प्रत्येकवेळी प्रयत्न केला.

पण तो प्रत्येकवेळी ठिकाणं बदलायचा. त्यामुळे तो आमच्या हाती आला नाही. मात्र, तो अंधेरी स्टेशनवर पोहोचणार असल्याची खबर आम्हाला मिळाली अन् त्यानंतर तो आमच्या तावडीत सापडला, असं पोलिसांनी सांगितलं.

भावासोबत राहायचा

राहुल गेल्या काही वर्षापासून त्याच्या भावासोबत राहत होता. पुण्यात दोघेही राहत होते. तिथेच तो फुड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याचा भाऊही छोटेमोठे काम करत होता. राहुल पार्टटाईम जॉब करून एमपीएससीची परीक्षा देत होता, असंही पोलिसांनी सांगितलं.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दर्शना

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
Next Post
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

मोठी बातमी! राज्यातील साडेबारा कोटी जनतेला 5 लाखांचा आरोग्य विमा; महाराष्ट्र सरकारचे 40 मोठे निर्णय..

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा