mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्याचे नाव बदललं, आता अहिल्यादेवीनगर म्हणायचं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 1, 2023
in राज्य
शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने अहमनदगरच्या नामांतरची घोषणा केलीये.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीये.

जामखेडच्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.

याच कार्यक्रमात नामांतराची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. याशिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, रमेश शेंडगे यावेळी उपस्थित होते..

अहिल्यादेवींचं नाव दिल्याने जिल्ह्याचा सन्मान वाढेलयावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेण्याचे भाग्य आमच्या सरकारला मिळाले आहे.

अहिल्यादेवी यांचे कार्य हिमालयाएवढे होते. त्यांचे नाव दिल्याने या जिल्ह्याचा सन्मान वाढणार आहे. अहिल्यादेवी यांची ३०० वी जयंती आपण जगाला हेवा वाटवा, अशा पद्धतीने साजरी करू- मुख्यमंत्री राज्यात सध्या सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे.

गेल्यावर्षी येथे येऊन काही मंडळींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर अवघ्या २० दिवसांताच त्यांचे सरकार आम्ही घालविले.

अहिल्यादेवी यांची ३०० वी जयंती आपण जगाला हेवा वाटवा, अशा पद्धतीने साजरी करू. धनगर समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या एका बैठकीत सोडविल्या जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री छत्रपतींचा मावळा : फडणवीसयापूर्वी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, राजामाता अहिल्यादेवी खऱ्या अर्थाने धर्मरक्षक होत्या. त्यांनी अनेक मंदिरे वाचविली. खऱ्या अर्थाने त्यांनी धर्मरक्षणाचे काम केले.

त्यांचे नाव या जिल्ह्याला दिले पाहिजे, अशी मागणी होत आहे. ती योग्यच आहे. आमच्या सरकारने छत्रपती संभाजीगर आणि धाराशीव निर्माण केले. तसेच या जिल्ह्याचेही नाव बदलले जाईल.

छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या मागणीवर सरकारचा निर्णय जाहीर करावा. धनगर समाजाच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

गोपीचंद पडळकर ठरले हिरोआजच्या जयंती उत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे होते. मात्र, संपूर्ण कार्यक्रमावर आमदार गोपीचंद पडळकर यांचीच छाप दिसून आली. वक्त्याने त्यांचे नाव घेताच प्रेक्षकांमधून टाळ्या आणि शिट्टया येत होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाच्या सुरवातीलाच त्यांना जवळ बोलावून घेतले.

त्यानंतर जेव्हा नामांतराची घोषणा केली, तेव्हाही प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. गेल्यावर्षी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी सरकारी कार्यक्रमाच्यावेळी पडळकर यांना चौंडीत प्रवेश बंदी करण्यात आली होती. गावाच्या बाहेरच त्यांना अडवून धरण्यावरून गोंधळ झाला होता.

जयंती समारंभानंतर काही दिवसांतच पडळकर यांनी सरकारला पत्र लिहून अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगरी नाव देण्याची मागणी केली. त्यानंतर सत्तांतर झाले. पहिल्याच अधिवेशनात सरकारने यासंबंधीची घोषणा केली. त्याची कागदोपत्री प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

आज जयंतीचे निमित्त साधून मुख्यमंत्र्यांनी नामांतराचा निर्णय झाल्याची घोषणा केली. त्यामुळे आजही पडळकर हिरो ठरले. नामांतरानंतर ‘तसाच’ तिढा उद्भवणार?यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे केले होते. केंद्र सरकारनेही या नामांतराला मंजुरी दिली होती.

मात्र, याविरोधात अनेकांनी न्यायालयात धाव घेतली होती. या तांत्रिक आणि प्रशासकीय पेचांमुळे अद्याप शासन दरबारी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव ही नवी नावे वापरण्यास सुरुवात झाली नव्हती. हा पेच सुटेपर्यंत शासन दरबारी औरंगाबाद आणि उस्मानाबाद हाच उल्लेख प्रचलित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अहमदनगरच्या नामांतरानंतरही असाच तिढा उद्भवणार का, हे पाहावे लागेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अहिल्यानगरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 21, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

सावधान! हवामानत मोठा बदल ‘या’ तारखे दरम्यान वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात; कृषी विभागाचं आवाहन

April 20, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 18, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 20, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
Next Post
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढ्यातील स्मारकासाठी आंदोलन उभारणार; बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले जाहीर

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 21, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा