mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मोटरसायकलला कट मारल्याच्या कारणावरून तरुणाचा भर चौकात खून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 23, 2023
in क्राईम, सोलापूर
विकृती! तीन महिलांच्या खुनामागे शेती व पूर्व वैमनस्याचे प्राथमिक तपासात कबुली

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सांगोला प्रतिनिधी

मोटरसायकलला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना वाकी घेरडी (ता. सांगोला) येथे 22 मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली आहे.

अमोल विश्वास लवटे (वय – 23 वर्षे, रा. वाकी घेरडी, ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव होय.

याप्रकरणी शिवाजी पवार, शरद शिवाजी पवार, भारत शिवाजी पवार, शांताबाई शिवाजी पवार व विजुबाई जाधव (सर्व रा. वाकी घेरडी, ता. सांगोला) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मोहन केराप्पा लवटे (रा. वाकी घेरडी, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 22 मे रोजी अंदाजे पावणे आठ वाजण्याच्या सुमारास वाकी घेरडी चौकातून

फिर्यादीचा चुलत भाऊ अमोल विश्वास लवटे हा महेश लवटे सोबत फॅशन मोटर सायकलवरून (क्रमांक – एम. एच – 13, ए.ए – 19 78) मुंबईला जाणाऱ्या मावशीला ज्वारी देण्यात जात होता.

यावेळी समोरून सांगोला ती वाकी घेरडी असे भरधाव वेगात वळणाच्या रस्त्यावरून येणाऱ्या इनोव्हा (क्रमांक – एम.एच-12, सी. आर – 9759) गाडीच्या चालक शरद शिवाजी पवार यांनी मोटरसायकलला कट मारल्याने मोटरसायकल रस्त्याच्या खाली उतरली.

मोटरसायकल चालक अमोल लवटे व इनोव्हा चालक यांच्यात वाद झाला. त्याचवेळी शिवाजी पवार गाडीतून उतरून शरद व भारत यांना अमोल यास धरून ठेवण्यास सांगून घरी जाऊन घरून येताना

शांताबाई व विजुबाई यांना मिरची पूड घेऊन स्वतः लांब टोकदार धारदार चाकून घेऊन आला. त्या दोघींनी अमोलच्या डोळ्यात मिरची पूड टाकली.

त्याचवेळी शिवाजी पवार याने अमोलच्या डाव्या बरगडीत चाकू खूपसून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला.

यामुळे शिवाजी पवार, शरद शिवाजी पवार, भारत शिवाजी पवार, शांताबाई शिवाजी पवार व विजुबाई जाधव (सर्व रा.वाकी घेरडी, ता.सांगोला) याच्या विरुद्ध फिर्यादीने फिर्याद दिली आहे.

घटनेची माहिती समजताच सांगोल्याची पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या खूनाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निर्घृण हत्या

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

​अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह जुगाऱ्यांचा खेळ खंडोबा

July 4, 2026
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

July 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

July 3, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​सणाच्या नावाखाली अश्लीलता! मंगळवेढ्यात विनापरवाना महिलांचे डान्स प्रोग्राम आयोजित करणाऱ्या ७ जणांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

July 1, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

मंगळवेढ्यात खळबळ! शेतरस्ता खुला करताना मंडल अधिकाऱ्याची धरली गच्ची; ६ जणांवर गुन्हा

July 1, 2026
Next Post

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या हाडांची मोफत तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 6, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 5, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा