mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आर-पारची लढाई! सत्तासंघर्षाचा निकाल ‘या’ 3 पैकी एका तारखेलाच लागण्याची दाट शक्यता; निकाल लागेल म्हणजे काय होईल?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 9, 2023
in राजकारण, राज्य
ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज सर्वोच्च न्यायलायने फेटाळला; सेनेची लढाई आता…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

ए म.आर.शाह 15 मे रोजी निवृत्त होत आहेत आणि 20 मे पासून सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी सुरु होतेय. एक स्वाभाविक आहे, की न्यायमूर्ती एम.आर. शाहांच्या निवृत्तीआधीच निकाल लागू शकतो.

आता त्यांची निवृत्तीची 15 तारीख जर लक्षात घेतली आणि इतर तारखा किंवा सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा विचार केला तर सुप्रीम कोर्टाचं कामकाज सोमवारी ते शुक्रवारपर्यंत चालतं.

10 तारखेला बुधवार आहे….सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरु आहे, 11 तारखेला गुरुवार आहे…कामकाज सुरु आहे, 12 तारखेला शुक्रवार आहे…

कामकाज सुरु आहे, 13 तारखेला शनिवार आहे…कामकाज बंद असेल, 14 तारखेला रविवार आहे…कामकाज बंद असेल

आता या 5 तारखांपैकी 3 दिवस फार महत्वाचे आहे. 10, 11 आणि 12 तारीख. त्यामुळे या 3 दिवसांत निकाल लागण्याची शक्यता आहे.

निकाल लागेल म्हणजे काय होईल?

ठाकरे गटाची याचिका आहे की, एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करा. तर शिंदेंच्या शिवसेनेची याचिका आहे की, ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र व्हावेत.

सुप्रीम कोर्टाच्या निकालातली महत्वाची बाब ही असेल की, घटनापीठ प्रकरण कोणाकडे सोपवणार? सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर की तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ?

कारण घटनातज्ज्ञांच्या मते, आमदारांना थेट अपात्र करण्याचा अधिकार, सुप्रीम कोर्टाला नाही आणि झिरवळांनी तर स्पष्टच सांगितलंय की, “माझ्याकडे प्रकरण आलं की 16 आमदार अपात्र होणार”

निकाल जाहीर झाल्यावर नेमकं काय होणार?

प्रकरण कोणत्या अध्यक्षांकडे जाणार हे तर घटनापीठ निकाल देईल त्याचवेळी स्पष्ट होईल. पण समजा जर तरच्या खोलात गेलोच, तर काय होतंय तेही समजून घेऊयात.

भाजप-शिंदेंच्या शिवसेनेकडे 164 आमदारांचं संख्याबळ आहे. महाराष्ट्र विधानसभेचं एकूण संख्याबळ 288 आमदारांचं आहे आणि बहुमताचा आकडा 145 आमदारांचा आहे.

आता जर, 16 आमदार अपात्र झालेच तरीही बहुमत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचे असेल. कारण 164 आमदारांमधून 16 आमदार कमी झाल्यास संख्याबळ 148 आमदार इतकं होतं. त्याचवेळी 16 आमदार कमी झाल्यानंतर, बहुमताचा आकडाही कमी होईल.

288 मधून 16 आमदार कमी केल्यावर 272 आमदार होतात आणि बहुमताचा आकडा 137 आमदार होईल. 16 आमदार अपात्र झाल्यावरही शिंदे आणि भाजपच्या शिवसेनेकडे 148 आमदार आहेत. म्हणजेच बहुमत गमावत नाहीत.

बहुमताच्या खेळात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची बाजू भक्कम राहिली तरी एक झटका जोरदार बसणार. 16 आमदार अपात्र झालेच तर 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव आहे आणि मुख्यमंत्रीच जर अपात्र झाले तर सरकारच कोसळणार. मात्र बहुमताच्या जोरावर पुन्हा नव्यानं सरकार स्थापन होईल, आणि नवा मुख्यमंत्री कोण असेल? हे भाजपला ठरवावं लागेल.

त्याचवेळी 16 आमदार अपात्र झाल्यानंतर, 16 मतदारसंघात निवडणूका घोषित होतील. कारण कर्नाटकमध्ये 2019 ला, 17 आमदारांना 6 वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आलं होतं.

मात्र अपात्र आमदारांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टानं अपात्रता कायम ठेवत, तात्काळ निवडणुकीचे आदेश दिले होते आणि निवडणुका झाल्या.

आमदार अपात्र झाले तरी, सध्याच्या सरकारकडेच बहुमत राहिल, हे विरोधकांनाही माहिती आहे. त्यातच फडणवीसांनीही पुन्हा येईन म्हणत सूचक इशाराही दिलाय.

सत्तासंघर्षाचा निकाल अपेक्षित असतानाच, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक लंडनला जाणार आहेत. विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात ज्या अॅडव्होकेट हरीश साळवेंनी युक्तिवाद केला, ते साळवेही लंडनमध्येच आहेत.

सत्तासंघर्षाला 10 महिने झालेत. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल काय असेल, याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात. निकालाची आतुरता आठवड्याभरातच संपेल असं सध्या तरी चित्र आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सत्ता संघर्ष

संबंधित बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, उपोषण सोडलं; सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री काय घडलं?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
Next Post
चिंताजनक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील जनावरात लंपीची लक्षणे? पशुधन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने पाठवले

काळजी घ्या! मंगळवेढ्यात वाढला लंपीचा प्रादुर्भाव; सोलापुरात लम्पी स्कीनने पुन्हा ४३ जनावरे बाधित; सर्वाधिक जनावरे 'या' तालुक्यातील

ताज्या बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 4, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा