मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यात सध्या लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आटोक्यात असला, तरीही जिल्ह्यात आतापर्यंत ७४० जनावरे लम्पी बाधित झाली आहेत. त्यात सर्वाधिक २२७ जनावरे मंगळवेढा तालुक्यातील आहेत.
गेल्या दोन दिवसांत त्यात पुन्हा वाढ झाली असून, या दोन दिवसांत सर्वाधिक ४३ जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली असल्याचे आढळले आहे.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लम्पी स्कीनग्रस्त जनावरांच्या संख्येत चढ-उतार होतो आहे.
पण एकूणच परिस्थिती पाहता, जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यात ही संख्या असली, तरी काही ठरावीक भागातच ही जनावरे अधिक आढळत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात ४५, बार्शी तालुक्यात ४७, करमाळा तालुक्यात १२, माढा तालुक्यात ५५, माळशिरस तालुक्यात २७,
मंगळवेढा तालुक्यात २२७, मोहोळमध्ये १०६, उत्तर सोलापुरात आठ, पंढरपुरात ६३ आणि सांगोल्यात १०१, दक्षिण सोलापुरात ४९ अशी एकूण ७४० जनावरे बाधित आहेत. नव्याने आढळलेली ४३ जनावरे पंढरपूर, मोहोळ, सांगोला, माळशिरस तालुक्यांतील आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ४४३ जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाली होती. त्यापैकी ३५ हजार ९१७ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर लम्पी स्कीनमुळे ३ हजार ७८६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
सध्या मंगळवेढ्यात वाढत असलेल्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी स्वतंत्र नियोजन केल्याचेही सांगण्यात आले.
जिल्ह्याची पुन्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल सद्य:स्थितीत १४ सक्रिय रुग्ण; सहा तालुके निरंक
सोलापूर जिल्ह्यातील पाच हजार २५१ कुटुंबाचा आधार हिरावणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात सध्या १४ सक्रिय रुग्ण असून त्यांना कोणतीही तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव मागील महिन्यात खूपच वाढला होता. पण, आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याची स्थिती आहे. दुसरीकडे कोरोना संशयितांचे टेस्टिंग देखील दररोज सरासरी १०० पर्यंतच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अक्कलकोट, माढा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.
दुसरीकडे बार्शी तालुक्यात सर्वाधिक चार रुग्ण असून तालुक्यातील ग्रामीण भागात एकही रुग्ण नाही. करमाळा व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी दोन तर मोहोळ तालुक्यात एक रुग्ण आहे. पण, तिन्ही तालुक्यातील शहरी भागात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण सद्य:स्थितीत नाही. सध्या ग्रामीणमधील आठ पुरुष व एक महिला तर शहरातील तीन पुरुष व दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह
गर्दीच्या ठिकाणी शक्यतो विशेषतः पूर्वीचा गंभीर आजार असलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला असावा. सर्दी, खोकला असलेल्यांनी ताबडतोब कोरोनाची चाचणी करून घ्यावी. वेळेत उपचार झाल्यास पुढील संभाव्य धोका टाळता येतो. सर्वांनीच कोरोनापूर्व खबरदारी घेतल्यास धोका कमी होतो. प्रतिबंधित लसीचे देखील डोस टोचून घेणे आवश्यक असल्याचे आरोग्याधिकाऱ्यांचे मत आहे.
गर्दीत मास्क आवश्यकच
जिल्ह्याची आतापर्यंतची स्थिती
■ एकूण पुरुष बाधित – १,३२,५९४
■ महिला बाधित ८९,८६०
■ एकूण बाधित – २,२२, ४५४ ■ कोरोनाचे बळी – ५,२५१
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज