mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेंनी मंगळवेढेकरांची मने जिंकली; दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूजचे पत्रकारितेतील सातत्य हीच खरी विश्वासाहर्ता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 2, 2023
in मंगळवेढा, मनोरंजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पत्रकारांनी कसे असावे, काळानुरूप कोणते बदल करावेत, त्याचबरोबर काळाच्याही पुढे जाण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत, याची जाण ठेवत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूजने आपला सातत्यपणा कायम ठेवत आपला 13 वा व 5 वा वर्धापन दिन साजरा केला असून जनमानसात असलेली हिच खरी विश्वासाहर्ता असल्याचे प्रतिपादन मराठी सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केले.

दै.दामाजी एक्सप्रेस 13 वा व दामाजी न्यूज च्या 5 व्या वर्धापनदिनानिमित्त जवाहरलाल हायस्कूल मंगळवेढा येथे आयोजित वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत दामाजी शुगर्सचे माजी चेअरमन अ‍ॅड नंदकुमार पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी नारायण सुमंत उपस्थित होते.

व्यासपीठावरधनश्रीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे,  रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, व्हा चेअरमन रामचंद्र जगताप,माजी मुख्याध्यापक सि.बा.यादव,माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके,

युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते जमीर पटेल, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.शिवाजीराव पवार, अ‍ॅड.बी.एन.पटवर्धन,अँड.भारत पवार,माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,

माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, अ‍ॅड दत्तात्रय तोडकरी,डॉ ज्योती कांबळे, बबलू सुतार,संपादक दिगंबर भगरे आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना भार्गवी चिरमुले म्हणाल्या की , माध्यमांचे काम केवळ लोकांच्या उणिवा दाखविणे नाही, तर चांगल्या लोकांना शोधून त्यांना सन्मानित करणे देखील आहे.

लोकांना आरसा दाखविणे, हे पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रेरणा देणेदेखील गरजेचे आहे. लोकांना आशेचा किरण दाखविणे, ही पत्रकारितेची एक विशेषत: आहे.

वस्तुस्थिती दाखविणे आणि लोकांना आशेचा किरण दाखवीत समाजाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणे, हे काम पत्रकारितेचे करणे अपेक्षित असते तेच काम दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज  यशस्वी रित्या करत आहे ही बाब कौतुकास्पद आहे.

प्रिंटमध्ये व्यक्त व्हायचे की इलेक्ट्रॉनिक्स मिडियावर स्वार व्हायचे, की डिजिटल माध्यमांतून लाखोंपर्यंत पोहचायचे ही सर्व माध्यम निवड आहे.

मात्र पत्रकारिता आणि पत्रकारितेचा पाया असणारी बातमी, तिचा विषय हा तुमच्या संवेदनशिलतेचा, प्रामाणिकतेचा, जाणिवांचा आणि बांधिलकीचा अर्क असतो. तुमच्या विषयांच्या निवडीवरच माध्यम कोणतेही बदलले तरी पत्रकारितेचे वैभव अवलंबून असेल, ते वैभव जपण्याचे काम दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज करत आहे.

तसेच दै दामाजी एक्सप्रेस चे साहित्य इतके वाचनीय असून हे साहित्य मंगळवेढा सारख्या ठिकाणी दै दामाजी एक्सप्रेस वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतय यासाठी मंगळवेढेकर खूप नशीबवान आहेत.

कोणत्याही क्षेत्रात कष्ट केल्याशिवाय तसेच जिद्द आणि चिकाटी असल्याशिवाय  यश मिळतच नाही …दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज ने अफाट कष्ट, संघटन या गोष्टींमुळे आज दिमाखात वर्धापन होत आहे. दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज चे कार्य असेच निरंतर चालत रहावे या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठ कवी नारायण सुमंत म्हणाले, मंगळवेढा या संत भूमीत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज ने वेगळी ओळख निर्माण करत पत्रकारितेत कौतुकास्पद काम केले आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने मीडिया क्षेत्रात आमूलाग्र बदल केले आहेत. जनसंवादासाठी नव-नवीन माध्यमांचे अविष्कार हा त्याचाच भाग आहे. पत्रकारिता क्षेत्रात दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज ने वेगळा ठसा उमटवून आपले कार्य कर्तुत्व सिद्ध केले आहे.

तसेच त्यांनी तोच पंढरीचा काळा विठुराया माझ्यामध्ये वाहतो,  झाडे फक्त एकच गुन्हा  करतात.ही कविता सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

संत भूमीत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज चे समाजमनावर असलेलं नाव असच झळकत राहो या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना नंदकुमार पवार म्हणाले, मंगळवेढा ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून या  संतभूमीत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज चे काम समाजाभिमुख असून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे ही गोष्ट अभिमानास्पद आहे.

दै दामाजी एक्सप्रेस ने साहित्य,कला तसेच विविध विषयांच्या अनुषंगाने एक वेगळी ओळख निर्माण करत पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळेपणा सिद्ध केला आहे…असे मत व्यक्त करत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज ला शुभेच्छा दिल्या.

यावेळी साजन बेंद्रे यांनी बहारदार आवाजात लोकगीत सादर करत मंत्रमुग्ध केले. या पुरस्कार वितरण सोहळयात दामाजी एक्सप्रेसच्या पुरस्काराचे मानकरी ज्ञानोबा ढगे,साजन बेंद्रे,पै.महेंद्र गायकवाड,शुभदा पटवर्धन,अ‍ॅॅड.सुजीत कदम,निकिता पाटील,महादेव भगत,

भाऊसाहेब बेलदार,सुमंत गवळी,श्री दामाजी संस्था तसेच दामाजी न्यूजच्या पुरस्काराचे मानकरी हाजीबादशहा शेख,रामचंद्र वाकडे,सुरेश कोडग,दादाभाई शेख,महादेव बनसोडे,दिलीप बिनवडे,

महेश पाटील,यशवंत ढवण,सुहास ढगे व नवमहाराष्ट्र नवरात्र महोत्सव मंडळ यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र,शाल,पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संपादक प्रकाश जडे यांनी केले.तर अध्यक्षीय सूचना महेश वठारे यांनी मांडली त्यास, अनुमोदन विजय भगरे यांनी दिले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय भिमराव मोरे व भारत दत्तू यांनी केला. सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार राजेंद्रकुमार जाधव यांनी मानले.
—
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिनेत्री भार्गवी चिरमुले

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 25, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026

मंगळवेढ्यात खळबळ! शासकीय कामात अडथळा; शेत रस्त्याच्या कामावरून मंडळ अधिकारी व तलाठ्याला दमदाटी, गुन्हा दाखल

May 24, 2026
🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

May 24, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! मंगळवेढ्यात ‘नीट’ पेपर फुटीचे लोन? निकाल लागण्यापूर्वीच बॅनरबाजी करणारे ‘ते’ कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर?

May 22, 2026
डिजिटल क्लासरूम ते सुरक्षित बस सुविधा; मंगळवेढ्यातील ‘विद्या भारती पब्लिक स्कूल’मध्ये ॲडमिशन सुरू; प्रवेश प्रक्रियेला जोरदार सुरुवात; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

डिजिटल क्लासरूम ते सुरक्षित बस सुविधा; मंगळवेढ्यातील ‘विद्या भारती पब्लिक स्कूल’मध्ये ॲडमिशन सुरू; प्रवेश प्रक्रियेला जोरदार सुरुवात; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

May 22, 2026
मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

May 21, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

May 21, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

दुर्दैवी! सद्‌गुरुंच्या बैठकीहून पत्नीला आणण्यासाठी निघाले; पण वाटेतच कारने घेतला जीव; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 20, 2026
Next Post
आता मुंबईला जाण्यासाठी इंदापूरऐवजी अहमदनगरला वळसा घालावा लागणार

पालकमंत्री 'या' तारखेला सोलापुरात; मार्च अखेर निधी खर्च होणार? जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 25, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

May 25, 2026
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

May 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा