टीम मंगळवेढा टाईम्स ।
पत्रकारांनी कसे असावे, काळानुरूप कोणते बदल करावेत, त्याचबरोबर काळाच्याही पुढे जाण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत, याची जाण ठेवत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूजने आपला सातत्यपणा कायम ठेवत आपला 13 वा व 5 वा वर्धापन दिन साजरा केला असून जनमानसात असलेली हिच खरी विश्वासाहर्ता असल्याचे प्रतिपादन मराठी सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केले.
दै.दामाजी एक्सप्रेस 13 वा व दामाजी न्यूज च्या 5 व्या वर्धापनदिनानिमित्त जवाहरलाल हायस्कूल मंगळवेढा येथे आयोजित वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत दामाजी शुगर्सचे माजी चेअरमन अॅड नंदकुमार पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी नारायण सुमंत उपस्थित होते.
व्यासपीठावरधनश्रीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, व्हा चेअरमन रामचंद्र जगताप,माजी मुख्याध्यापक सि.बा.यादव,माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके,
युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते जमीर पटेल, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.शिवाजीराव पवार, अॅड.बी.एन.पटवर्धन,अँड.भारत पवार,माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,
माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, अॅड दत्तात्रय तोडकरी,डॉ ज्योती कांबळे, बबलू सुतार,संपादक दिगंबर भगरे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना भार्गवी चिरमुले म्हणाल्या की , माध्यमांचे काम केवळ लोकांच्या उणिवा दाखविणे नाही, तर चांगल्या लोकांना शोधून त्यांना सन्मानित करणे देखील आहे.
लोकांना आरसा दाखविणे, हे पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रेरणा देणेदेखील गरजेचे आहे. लोकांना आशेचा किरण दाखविणे, ही पत्रकारितेची एक विशेषत: आहे.
वस्तुस्थिती दाखविणे आणि लोकांना आशेचा किरण दाखवीत समाजाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणे, हे काम पत्रकारितेचे करणे अपेक्षित असते तेच काम दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज यशस्वी रित्या करत आहे ही बाब कौतुकास्पद आहे.
प्रिंटमध्ये व्यक्त व्हायचे की इलेक्ट्रॉनिक्स मिडियावर स्वार व्हायचे, की डिजिटल माध्यमांतून लाखोंपर्यंत पोहचायचे ही सर्व माध्यम निवड आहे.
मात्र पत्रकारिता आणि पत्रकारितेचा पाया असणारी बातमी, तिचा विषय हा तुमच्या संवेदनशिलतेचा, प्रामाणिकतेचा, जाणिवांचा आणि बांधिलकीचा अर्क असतो. तुमच्या विषयांच्या निवडीवरच माध्यम कोणतेही बदलले तरी पत्रकारितेचे वैभव अवलंबून असेल, ते वैभव जपण्याचे काम दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज करत आहे.
तसेच दै दामाजी एक्सप्रेस चे साहित्य इतके वाचनीय असून हे साहित्य मंगळवेढा सारख्या ठिकाणी दै दामाजी एक्सप्रेस वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतय यासाठी मंगळवेढेकर खूप नशीबवान आहेत.
कोणत्याही क्षेत्रात कष्ट केल्याशिवाय तसेच जिद्द आणि चिकाटी असल्याशिवाय यश मिळतच नाही …दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज ने अफाट कष्ट, संघटन या गोष्टींमुळे आज दिमाखात वर्धापन होत आहे. दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज चे कार्य असेच निरंतर चालत रहावे या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ कवी नारायण सुमंत म्हणाले, मंगळवेढा या संत भूमीत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज ने वेगळी ओळख निर्माण करत पत्रकारितेत कौतुकास्पद काम केले आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने मीडिया क्षेत्रात आमूलाग्र बदल केले आहेत. जनसंवादासाठी नव-नवीन माध्यमांचे अविष्कार हा त्याचाच भाग आहे. पत्रकारिता क्षेत्रात दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज ने वेगळा ठसा उमटवून आपले कार्य कर्तुत्व सिद्ध केले आहे.
तसेच त्यांनी तोच पंढरीचा काळा विठुराया माझ्यामध्ये वाहतो, झाडे फक्त एकच गुन्हा करतात.ही कविता सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
संत भूमीत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज चे समाजमनावर असलेलं नाव असच झळकत राहो या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना नंदकुमार पवार म्हणाले, मंगळवेढा ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून या संतभूमीत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज चे काम समाजाभिमुख असून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे ही गोष्ट अभिमानास्पद आहे.
दै दामाजी एक्सप्रेस ने साहित्य,कला तसेच विविध विषयांच्या अनुषंगाने एक वेगळी ओळख निर्माण करत पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळेपणा सिद्ध केला आहे…असे मत व्यक्त करत दै दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूज ला शुभेच्छा दिल्या.
यावेळी साजन बेंद्रे यांनी बहारदार आवाजात लोकगीत सादर करत मंत्रमुग्ध केले. या पुरस्कार वितरण सोहळयात दामाजी एक्सप्रेसच्या पुरस्काराचे मानकरी ज्ञानोबा ढगे,साजन बेंद्रे,पै.महेंद्र गायकवाड,शुभदा पटवर्धन,अॅॅड.सुजीत कदम,निकिता पाटील,महादेव भगत,
भाऊसाहेब बेलदार,सुमंत गवळी,श्री दामाजी संस्था तसेच दामाजी न्यूजच्या पुरस्काराचे मानकरी हाजीबादशहा शेख,रामचंद्र वाकडे,सुरेश कोडग,दादाभाई शेख,महादेव बनसोडे,दिलीप बिनवडे,
महेश पाटील,यशवंत ढवण,सुहास ढगे व नवमहाराष्ट्र नवरात्र महोत्सव मंडळ यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र,शाल,पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संपादक प्रकाश जडे यांनी केले.तर अध्यक्षीय सूचना महेश वठारे यांनी मांडली त्यास, अनुमोदन विजय भगरे यांनी दिले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय भिमराव मोरे व भारत दत्तू यांनी केला. सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार राजेंद्रकुमार जाधव यांनी मानले.
—
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज