टीम मंगळवेढा टाईम्स।
वडदेगाव येथील दत्ता नागनाथ बागल यांना चाकू पोटात खुपसून खून करून समाधान महादेव जाधव यास गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मंगेश सुरेश डोंगरे व समर्थ संजय जगताप यांचा सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर आरोपींचा जामीन फेटाळून लावला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मयत दत्ता बागल आणि मंगेश डोंगरे हे पूर्वी झालेल्या किरकोळ वाद प्रकरणी चर्चा करीत असताना मंगेश डोंगरे याने दत्ता याचे अंगावर येवून शिवीगाळी करत दत्ता यास का रे तुला लई मस्ती आली आहे का असे म्हणू लागला. त्याचे सोबतचा समर्थ जगताप हा दत्ता यास शिवीगाळी करू लागला.

त्यावेळी दत्ता व सारंग आठवले असे त्यांना आपण मिटवायला आलो आहे तुम्ही शिव्या कशाला देता असे म्हणत असताना मंगेश डोंगरे याने त्याचे पॅन्टचे खिशातून एक धारधार चाकू काढून तुला आज जिवंतच ठेवत नाही असे म्हणून भाऊ दत्ता यास जीवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे पोटात, छातीवर भोकसला.

चाकू भोकसल्यामूळे दत्ता हा गंभीर जखमी होवून खाली पडला त्यावेळी भाचा समाधान महादेव जाधव हा मध्ये येवून सोडवत असताना मंगेश डोंगरे याने त्याच चाकूने समाधान यास चाकूने वार करीत असताना त्याने वार चुकविला तो त्याचे डाव्या दंडावर लागला. त्यावेळी दुस-यांदा मंगेश याने आता तुला पण जिवंत सोडत नाही असे म्हणून जिवे ठार मारण्याच्या उददेशाने समाधान याचे पोटात चाकू भोकसून त्यास गंभीर जखमी केले.

याप्रकरणी फिर्यादी विठ्ठल नरसु बागल यांनी कामती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१),१०९(१),११५(२), १३१ ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
न्यायालयाचा निर्णय:
सदर प्रकरणी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जोशी सो. यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध ठोस प्रथमदर्शनी पुरावा (Prima Facie Evidence) उपलब्ध असल्याने व सदर घटनेस नेत्र साक्षीदार असून सर्व साक्षीदार हे त्या गावातील रहिवासी आहेत.
आरोपीला जामिनावर मुक्त केल्यास, फिर्यादी पक्षाच्या पुराव्यांशी छेडछाड होण्याची आणि साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता असल्याने
आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध असल्याने आणि गोळा केलेल्या पुराव्यावरून त्यांची सक्रिय भूमिका दिसून येत असल्याने, दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही त्यांना जामिनावर मुक्त करणे न्याय आणि योग्य ठरणार नाही. त्यामुळे सदर आरोपी यांचा जमीन अर्ज दि. २९/०९/२०२६ रोजी फेटाळून लावण्यात आला.
या संवेदनशील प्रकरणात सरकार तर्फे ॲड गोरे व मूळ फिर्यादी विठ्ठल बागल यांचे वतीने ॲड. मिलिंद थोबडे, ॲड.विनोद सूर्यवंशी, ॲड संगम मोरे, ॲड ओंकार भुसे यांनी काम पाहिले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









