mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सस्पेन्स संपला! ठाकरे सरकारची 9 मते फुटली, धनंजय महाडिक यांचा विजय; राज्यसभा निवडणुकीचा  निकाल जाहीर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 11, 2022
in राज्य
सस्पेन्स संपला! ठाकरे सरकारची 9 मते फुटली, धनंजय महाडिक यांचा विजय; राज्यसभा निवडणुकीचा  निकाल जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षीत राज्यसभा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. यात पहिल्या फेरीत ५ उमेदवार विजयी झाले आहेत. यात शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांचा समावेश आहे.

तर सहाव्या जागेसाठी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक अशी चुरस सुरु झालेली आहे.

पहिल्या फेरीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये संजय राऊत यांना ४१ मत मिळाली. प्रफुल्ल पटेल यांना ४३, इम्रान प्रतापगढी यांना ४४ मत मिळाली. तर पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मत मिळाली आहेत. तर पहिल्या फेरीमध्ये धनंजय महाडिक यांना २७ मत मिळाली आहेत आणि पवार यांना ३३ मत मिळाली आहेत.

प्रथमतः दिसणाऱ्या आकडेवारीनुसार भाजपला असणाऱ्या पहिल्या पसंतीच्या मतामध्ये १२३ मत मिळाली आहेत. जी किमान ९ मत जास्त मिळाली आहेत. ही सर्व मत महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांची आहेत. भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची मत जास्त असल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकावर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेचे संजय पवार पराभव झाला आहेत.

9 तासानंतर राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स संपला! निकाल जाहीर, कुणाची कुणावर किती मतांनी मात?

राज्यसभा निवडणूक निकालाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मतदानानंतर तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला. त्यात या निवडणुकीत भाजपचे तीन, तर शिवसेनेचा एक, राष्ट्रवादीचा एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झालाय.

त्यात पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळाली. त्यातच शुक्रवारी मतदान पार पडलं.

मात्र, संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकमेकांच्या काही आमदारांच्या मतावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे निकालाला मध्यरात्री उजाडली.

मात्र, महत्वाची बाब म्हणजे भाजपनं घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं. तर उर्वरित 284 मतं वैध ठरवण्यात आली.

राज्यसभा निवडणुकांचा निकाल अखेरीस लागला आहे. यात अपेक्षेप्रमाणे मविआचे तीन आणि भाजपाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे संजय राऊत यांना 41 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या पसंतीची 44 मते मिळाली आहेत.

भाजपाच्या पियुष गोयल यांना 48 तर अनिल बोंडे यांना 48 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते तर महाडिक यांना पहिल्या पसंतीची 26 मते मिळाली आहे.

भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी उमेदवार विजयी होणार यात कुठलीही शंका नव्हती. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी देण्यात आलेल्या उमेदवारापैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

या निवडणुकीत भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.

सहाव्या जागेवर महाडिक विजयी, पवारांचा पराभव

सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडूनही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्यात आली होती.

कोल्हापूरच्या आखाड्यात कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपनं यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.

कुणाचे किती उमेदवार विजयी?

भाजप – 3
शिवसेना – 1
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी काँग्रेस – 1
पहिल्या पसंतीची कुणाला किती मते?

प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस- 43
इम्रान प्रतापगढी, काँग्रेस – 44
संजय राऊत, शिवसेना – 41
पियुष गोयल, भाजप – 48
अनिल बोंडे, भाजप – 48
सहाव्या जागेवर कोणत्या उमेदवाराची बाजी?

धनंजय महाडिक, भाजप – 41
संजय पवार, शिवसेना – 33

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनंजय महाडिक

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
Next Post
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखाना! 'हरकत'दारांनी गाजवला अख्खा दिवस, 'इतके' अर्ज नामंजूर; 'या' अर्जांवरील निकाल राखून ठेवले

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा