mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! राज्यात दीड महिन्यांत कोरोना रुग्णसंख्या सातपटीने वाढली; मुख्यमंत्र्यांनी केले नागरिकांना ‘हे’ आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 2, 2022
in राज्य
महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे, राज्य सरकार पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल.

निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे,

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

दीड महिन्यांत सात पट रुग्ण वाढले

या बैठकीच्या प्रारंभी डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली.१६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते.

आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असे सांगून डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की,

मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचा देखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही ते म्हणाले.

रुग्णसंख्या वाढते आहे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, यावर भर दिला पाहिजे.

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा

कोरोना कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना उद्धव यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

कोरोना चाचण्या वाढवा

कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लवकरच शाळा सुरू होतील.

शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे आपली मते मांडली.

नागरिकांना आवाहन

ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्या, गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी, आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी, ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 21, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

सावधान! हवामानत मोठा बदल ‘या’ तारखे दरम्यान वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात; कृषी विभागाचं आवाहन

April 20, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 18, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 20, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
Next Post
मंगळवेढ्यात पुनर्रचनेने कही खुशी, कही गम, ‘हा’ गट आला संपुष्टात, तर नंदेश्वर, चोखामेळा नगर नवे गट; इच्छुकांची डोकेदुखी वाढली

मंगळवेढ्यात पुनर्रचनेने कही खुशी, कही गम, 'हा' गट आला संपुष्टात, तर नंदेश्वर, चोखामेळा नगर नवे गट; इच्छुकांची डोकेदुखी वाढली

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 21, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा