mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात लाच स्विकारलेल्या त्या दोघांना मिळाली ‘इतक्या’ दिवसाची न्यायालयीन कोठडी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 28, 2022
in मंगळवेढा
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शासकिय स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या मासिक चलनाचा भरणा करण्याकरीता 1200 रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी पुरवठा निरिक्षक उत्तम वामन गायकवाड (वय 39),खाजगी इसम बालाजी सिध्देश्‍वर यादव(वय 25,मारापूर) या दोघांना लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता त्या दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या घटनेची हकिकत अशी,मंगळवेढा पुरवठा विभागात आरोपी उत्तम गायकवाड हे पुरवठा निरिक्षक असून खाजगी इसम तथा आरोपी बालाजी यादव हा संगणक ऑपरेटर आहे.

दि.12 मे रोजी 1.33 व दि.26 रोजी 1.49 वाजता फिर्यादी हा शनिवार पेठेतील स्वस्त धान्य दुकानदार असून आरोपी यादव याने चलनाच्या रकमेव्यतिरिक्त साहेबांना मासिक हप्ता म्हणून 1200 रुपये दयावे लागतील.

असे म्हणून दि.26 रोजी 5.50 वाजता 1200 रुपयांची लाच स्विकारताना शासकिय धान्य गोदामात लाच लुचपत पथकाने रंगेहाथ पकडून दि.27 च्या पहाटे 4.00 वा. वरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासिक अंमलदार उमेश महाडिक यांनी आरोपींना अटक करून पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान,लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे तहसील कार्यालयात शुक्रवारी शुकशुकाट होता. अधिकार्‍यांच्या खुर्च्याही काम घेवून येणार्‍या नागरिकांना रिकाम्या दिसत असल्यामुळे त्याबाबत उलट सुलट चर्चेला दिवसभर उधाण आले होते.

मंगळवेढा तालुक्यात 105 स्वस्त धान्य दुकाने असून हा लाचेचा प्रकार पारंपारिक असल्याची चर्चा तहसील कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदारांमधून सुरू होती.महिन्याकाठी जवळपास दीड लाखाचे कलेक्शन होत असल्याचाही सूर स्वस्त धान्य दुकानदारामधून या कारवाईमुळे निघत होता.

ही रक्कम कोणाकोणाकडे जात होती याचा तपास मूळाशी जावून होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

यातील खाजगी इसम हा यापुर्वी रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचे काम करत असतानाही त्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे नागरिकांनी केल्या होत्या.

यावर वरिष्ठांनी त्याला पुन्हा शासकिय गोडावूनकडे रिचार्ज केल्यानेच लाचेसारख्या भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असून याला सर्वस्वी वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस कोठडी

संबंधित बातम्या

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
Next Post
नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून विना मास्कचे फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

नागरिकांनो सावधान! महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; पुन्हा निर्बंध लागणार?

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..