mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर पत्राद्वारे खा.संभाजीराजे छत्रपती यांनी निशाणा साधला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 20, 2021
in राज्य
पोटनिवडणुक बिनविरोध करा, हीच भारत नानांना खरी श्रद्धांजली असेल : युवराज छत्रपती संभाजीराजे

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच जोर धरत आहे. राज्य सरकारवर विरोधकांकडून आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

त्यातच आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर पत्राद्वारे निशाणा साधला आहे.

मराठा समाजाच्या हितासाठी राज्य शासनाने केवळ गांभीर्याने विचारच केलेला नाही, तर अनेक मुद्द्यांवर कार्यवाहीदेखील केली आहे, असे सांगत राज्य शासनाने कोणी कोणते निर्णय घेतले,

याचे तब्बल १५ पानी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पाठवले आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांना वगळून, मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट छत्रपती संभाजीराजे यांना पत्र लिहिल्यामुळे अन्य नेतेही यामुळे बुचकळ्यात पडले आहेत.

शुक्रवारी नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नांदेड जिल्ह्यातील आमदार, खासदार लोकप्रतिनिधींसह छत्रपती संभाजीराजे मूक आंदोलन करणार आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे पत्र दिले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने काय करायचे बाकी राहिले आहे, हे सांगण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आली आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर भोसले समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली असून, अद्याप ती न्यायप्रविष्ट आहे आणि त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असेही या पत्रात म्हटले आहे.

राज्य विधानमंडळाने देखील आरक्षणाची ५०% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता घटनेत योग्य ती सुधारणा करावी अशी शिफारस केंद्र सरकारला ठरावाद्वारे केली आहे.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र देण्यात आले असून प्रत्यक्ष एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना माझ्या नेतृत्वाखाली भेटले देखील आहे असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्य सरकारने २०१४ च्या ईएसबीसी अध्यादेशानुसार १४ नोव्हेंबर २०१४ पर्यंत उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशापर्यंत देण्यात आलेल्या नियुक्त्या कायम करण्याबाबत, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर निवड मंडळांना सूचना देणारे,

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास ९ सप्टेंबर २०२० रोजी स्थगिती देईपर्यंत एसईबीसी वर्गातून शासन सेवेत केलेल्या नियुक्त्या कायम करणारे, एवढेच नव्हे तर एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकाचा लाभ घेण्यास अराखीव उमेदवारांसाठी (खुला प्रवर्ग)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरीता १०% जागा आरक्षित करणारे सुधारित आदेश, पदभरतीकरीता सुधारीत बिंदुनामावली विहित केली गेली.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण अथवा अराखीव (खुला प्रवर्ग) विकल्पाबाबत ईडबल्यूएस आणि नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र देण्याकरिताचे सगळे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात काढले, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संभाजीराजे छत्रपती

संबंधित बातम्या

मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 27, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 25, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

कामाची बातमी! देवस्थान इनाम जमिनींबाबत महत्वाची अपडेट; राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

April 23, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

April 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
Next Post
रक्षाबंधनला बहिणीला करा खुश! ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये सेल सुरु; कमी बजेटमध्ये ब्रॅण्डेड कपडे उत्तम पर्याय

रक्षाबंधनला बहिणीला करा खुश! 'अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये सेल सुरु; कमी बजेटमध्ये ब्रॅण्डेड कपडे उत्तम पर्याय

ताज्या बातम्या

मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 27, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा