mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपुरात पायी वारीसाठी फक्त ‘एवढ्याच’ वारकऱ्यांना परवानगी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 7, 2021
in सोलापूर
वारकऱ्यांच्या लढ्याला यश! दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल मंदिराचे महाद्वार उघडले

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला बसने येणाऱ्या दहा पालख्यांसोबत ४०० वारकऱ्यांना येण्याची आणि वाखरीपासून प्रतिकात्मक पायी वारी करण्यास परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्ष पायी वारी करण्यास प्रत्येकी दोन म्हणजे केवळ २० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपूर शहरासह या परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

शनिवारी १७ जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवार २५ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

पंढरपूर शहरासह या परिसरातील भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, आदी गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी राहणार असून, अत्यावश्यक सेवांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.

सर्व मानाच्या १० पालख्या १९ जुलैला वाखरी येथे दुपारी तीनपर्यंत दाखल होणार आहेत. त्यानंतर वाखरी ते इसबावी येथील विसावा मंदिर हे तीन किलोमीटरचे अंतर पायी चालण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र दहा पालख्यांमधून प्रत्येकी दोन याप्रमाणे केवळ २० वारकऱ्यांनाच पायी वारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर वारकऱ्यांना मात्र बसमधूनच पंढरपूरमधील आपापल्या मठाच्या ठिकाणी रवाना व्हावे लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा
११ ते २८ जुलैदरम्यान पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच राहील. दहा पालख्या २४ जुलैला पंढरपूरहून परतीला निघतील.

२० जुलैला आषाढी एकादशी असून, यादिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाईची पूजा होणार आहे.(स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आषाढी एकादशी

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

खळबळ! थेट तहसीलदारांनाच धमकावले; ‘महा-ई-सेवा’ केंद्र चालकाची मुजोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

May 24, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा दाखल; रक्ताचं पाणी करून शिकवले, त्याच बापावर आली भीक मागण्याची वेळ; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

May 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! मंगळवेढ्यात ‘नीट’ पेपर फुटीचे लोन? निकाल लागण्यापूर्वीच बॅनरबाजी करणारे ‘ते’ कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर?

May 22, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘सुराज्य ग्राम मुक्काम मोहीम’ सुरू; ​कार्यालयांचे उंबरठे झिजवणे बंद; अधिकारी थेट तुमच्या गावात मुक्कामाला येणार

May 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

May 21, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 20, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमीन हडपण्याची भीती संपली! शेतजमीन भाडेपट्ट्यासाठी सरकारचा नवा कडक कायदा; या’ नव्या नियमामुळे पडीक जमिनी ओलिताखाली येणार

May 18, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधानपरिषदेचा धुराळा! सोलापूर महायुतीकडे, पण भाजपच्या कोट्यातून कोणाची लागणार लॉटरी? ‘या’ नावांची चर्चा; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

May 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी आ.समाधान आवताडेंची मोठी कामगिरी; परिवहन कार्यालयाच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

May 16, 2026
Next Post
कोरोना लसीचा डोस घेतल्यावर ‘हे’ पिता येणार नाही?.वाचा सविस्तर

ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे लसिकरणाच्या बाबतीत सुरू असलेला सावळा गोंधळ थांबवावा; भाजपची मागणी

ताज्या बातम्या

नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

May 25, 2026
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

May 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026

मंगळवेढ्यात खळबळ! शासकीय कामात अडथळा; शेत रस्त्याच्या कामावरून मंडळ अधिकारी व तलाठ्याला दमदाटी, गुन्हा दाखल

May 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा