mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका! ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 25, 2021
in राज्य
भीमा नदीकाठ गावांना धोक्याचा इशारा! उजनीतून भीमा पात्रात ‘एवढ्या’ लाख क्यूसेसचा विसर्ग

टीम मंगळवेढा टाइम्स ।

महाराष्ट्रात एकीकडे कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून राज्यात दुसरीकडे अवकाळी पावसाने पुन्हा डोके वर काढले आहे. या बदलत्या वातावरणामुळे अनेक राज्यात तीव्र उन्हाळा जाणवतोय तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

राज्यात येत्या ४ ते ५ दिवसात काही भागांमध्ये विजांच्या गडगडासह पावसाची शक्यता असून २५ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही भागात तर २७ ते २८ एप्रिलदरम्यान कोकणासह गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

या ऋतु बदलाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसला आहे. चंद्रपूरात शुक्रवारी भर दुपारी कडक्याच्या उन्हात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला.

चंद्रपूर जिल्हात नागरिक तीव्र उन्हाची झळ सोसत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील काहीसा गारवा चंद्रपूरकरांना अनुभवता आला.

मात्र ऐन उन्हाळ्यात तयार झालेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम रात्रीच्या वेळेस जावू लागला. राज्यात रात्रीच्या वेळी उकाड्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील काही आठवड्यात राज्य़ातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.

त्य़ानंतर हळूहळू तापमानाचा पार वाढत होता. मात्र तेवढ्यात वातावरणात पुन्हा बदल होत येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाटासह मुसळदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे राज्यात उद्यापासून हवामान मध्य स्वरुपाचे राहणार असून विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे.

सध्या दक्षिण तमिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिणेकडील बहुतांशी राज्यात अवकाळी पावसाची (Non seasonal Rain) स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यातही पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे.

जिल्ह्यानुसार पावसाची शक्यता खालील प्रमाणे :-

रविवारी (दि. 25) सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि संपूर्ण मराठवाडा

सोमवारी (दि. 26) सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा.

मंगळवारी (दि. 27) अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा.

बुधवारी (दि. 28) अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवकाळी पाऊस

संबंधित बातम्या

अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

March 21, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 15, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
सांगोल्यात धमकी देत मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 14, 2026
Next Post
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

पालकमंत्री दत्तात्रय भरणे उजनीच्या पाण्यावरून झाले आक्रमक! म्हणाले, राजकारणातून संन्यास घेईन...

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढ्याचा डंका! राज्यस्तरीय ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत न.पा. मुले शाळा नं. १ चे देदीप्यमान यश

March 25, 2026
कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

March 24, 2026
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

मंगळवेढ्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सारा कॉम्प्युटर’मध्ये CCC सह AI आणि कोडिंग कोर्सेसचे प्रवेश सुरू; आधुनिक काळाची गरज

March 24, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

​जनसेवेतून आदरांजली! कै.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; आज आंधळगावात नामवंत डॉक्टरांची टीम दाखल होणार

March 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा