mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! जुन्या ट्रॅक्टर मध्येही सीएनजी किट बसवता येणार, केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 13, 2021
in राज्य, राष्ट्रीय
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सध्या वाढते प्रदूषण आणि वाढते इंधन दर यामुळे पर्यावरणासह नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जुन्या वाहनांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आता जुन्या वाहनांसाठी स्क्रापिंग पॉलीसी आणण्यात येणार आहे. यामध्ये आता १५ वर्षांपूर्वीच्या वाहनांना स्क्राप करण्यात येणार आहे. तर पेट्रोल डीझेल ऐवजी सीएनजी वर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यावर सरकारकडून भर देण्यात येत आहे.

त्याच बरोबर शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरला देखील मोठ्या प्रमाणात इंधन लागते. तर देशातील जवळपास 60 टक्के कार, ट्रक, बस आणि ट्रॅक्टर डिझेलवर चालतात.

वापरल्या गेलेल्या एकूण डिझेलपैकी 13 टक्के ट्रॅक्टर, शेतीविषयक उपकरणे आणि पंपसेट इत्यादींमध्ये वापरली जातात. डिझेल वाहन 7-8 पेट्रोल वाहनांएवढे प्रदूषण पसरवते.

म्हणजेच ट्रॅक्टर 7-8 पेट्रोल कार इतके किंवा जास्त प्रदूषण पसरवितो, कारण ट्रॅक्टरमध्ये कारपेक्षा अधिक शक्ती असते.शुक्रवारी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सीएनजी ट्रॅक्टरचे लोकार्पण पार पडल.

यावेळी विशेष म्हणजे आता शेतकरी जुन्या ट्रॅक्टरमध्येही सीएनजी किट बसवू शकतील. शेतीत ट्रॅक्टर वापरण्यासाठी तासाला सरासरी 4 लिटर डिझेल लागते. (खर्च हा ट्रॅक्टरच्या हॉर्सपावरवर अवलंबून असतो) आणि त्याचा खर्च 78 रुपये प्रति लिटरनुसार 312 रुपये येतो.

त्याचबरोबर सीएनजीवर ट्रॅक्टर चालविण्यासाठी 4 तासांत सुमारे 180 रुपये खर्च अपेक्षित आहे. एका अंदाजानुसार शेतकऱ्यांना वर्षाकाठी 1 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने सीएनजी ट्रॅक्टरचे मानक निश्चित केलेत. त्यानुसार बाजारपेठेत हे ट्रॅक्टर उपलब्ध असतील.

ट्रॅक्टरमध्ये सीएनजी किट बसविण्यात येणार असून, यामुळे शेतीचा खर्च कमी होईल. ट्रॅक्टर लॉन्च करताना नितीन गडकरी म्हणाले की, सीएनजीच्या इतर वाहनांप्रमाणे सुरुवातीलाही ते सुरू करण्यासाठी डिझेलची गरज भासू शकेल.

यानंतर ते सीएनजीवरून चालतील. मेक इन इंडिया अंतर्गत सीएनजी किट तयार आहेत. शेतीमध्ये वापरली जाणारी इतर साधने बायो-सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे, असंही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले

7 किलो शेतातल्या कचऱ्यापासून 1 किलो बायो-सीएनजी तयार करता येतो. ते तयार करण्यासाठी सुमारे 15 रुपये खर्च येईल. शेतातल्या कचऱ्याची किंमत 1200 ते 1500 टनानुसार 10 रुपयांच्या आसपास असेल. अशा प्रकारे बायो-सीएनजीची किंमत सुमारे 25 रुपये किलोवर येईल.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मते सीएनजी मार्केट दरामध्ये उपलब्ध होईल, परंतु बायो-सीएनजीचा उपयोग यशस्वी झाल्यास त्याचा वापर वाढेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: केंद्र सरकारट्रॅक्टरसीएनजी

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

June 9, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील ‘त्या’ बोगस दाखल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ; ग्रामसेवकाला बजावली कारणे दाखवा नोटीस

मंगळवेढा ब्रेकिंग! बोगस दाखल्याप्रकरणी गुन्हा कुणावर दाखल करायचा? ग्रामसेवक म्हणतात...

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा