mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! बोगस दाखल्याप्रकरणी गुन्हा कुणावर दाखल करायचा? ग्रामसेवक म्हणतात…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 13, 2021
in मंगळवेढा
मंगळवेढ्यातील ‘त्या’ बोगस दाखल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ; ग्रामसेवकाला बजावली कारणे दाखवा नोटीस

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल 14 उमेदवारांचे अर्ज विविध हरकती घेत अपात्र करण्यात आले. हरकतीसाठी जोडलेल्या बनावट दाखल्यांवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांकडून देण्यात आले.

दरम्यान, गुन्हा कुणावर दाखल करावा, त्यांची नावे द्यावी, अशी मागणी ग्रामसेवकांनी केल्यामुळे मात्र खळबळ उडाली आहे.भोसे ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या वेळी पाच प्रभागांतील प्रभाग एकमध्ये तीन, दोनमध्ये चार, प्रभाग तीनमध्ये एक, प्रभाग चारमध्ये चार आणि प्रभाग पाचमधील सहा इतक्‍या उमेदवारांच्या अर्जांना हरकती घेण्यात आल्या.

त्यामध्ये त्या उमेदवारांकडे शौचालय नाही व काही उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे ठेकेदारी स्वरूपाचे काम केल्याचे पुरावे म्हणून ग्रामसेवकांचे दाखले जोडण्यात आले.

परंतु “त्या’ दाखल्यांबाबत या ग्रामपंचायतीकडे दोन ग्रामसेवकांनी कामकाज केल्याने हरकतीसाठी घेतलेले दाखले नेमके कुणाच्या सहीचे आहेत, हा प्रश्न अपात्र उमेदवारांना छाननीदरम्यान पडला होता.

प्रभारी ग्रामसेवकाने आपण ते दाखले दिलेले नाहीत, असे लेखी दिले. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. सदरची याचिका निकाली निघाली. दरम्यान, बनावट दाखल्यांप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी गटविकास अधिकारी यांना 21 जानेवारीला दिले.

तत्कालीन प्रभारी ग्रामसेवक दत्तात्रय इंगवले यांना सदर दाखल्यांप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. परंतु यामध्ये इंगोले यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

दरम्यान, या नोटिशीत ग्रामसेवकांनी आपणास भोसे ग्रामपंचायतीचा पदभार 28 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता दिला, त्याच कालावधीत मुढवी ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे सदर ग्रामपंचायतीचा पदभार घेतला नाही, त्यामुळे भोसे ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

सदर ग्रामपंचायतीचा पदभार न देताच तो एक दिवसात काढून घेण्यात आला, त्यामुळे सदर प्रकरणी कोणावर फिर्याद दाखल करावी, त्यांची नावे द्यावीत; शिवाय कोणत्या कारणास्तव उमेदवारांचे अर्ज फेटाळले याची माहिती विचारण्यासाठी तहसील कार्यालयात गेलो असता, प्रशासकीय कामकाज सुरू आहे,

तुम्ही बाहेर जा, असे सांगण्यात आले. त्यामुळे याबाबतची माहिती मिळू शकली नाही, असा खुलासा ग्रामसेवकाने गटविकास अधिकारी यांना केला.(सकाळ)

संधी दिली नाही….

निवडणुकी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी बंडू खेताडे यांच्या हरकतीवर म्हणणे सादर करण्यास संधी दिली नाही.बनावट दाखल्यांप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश होऊनही सरपंच निवडीपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करायचा नसल्याच्या कारणास्तव तहसील व पंचायत समितीकडून टोलवाटोलवी केली जात आहे– कर्मवीर आवताडे,अर्ज अपात्र ठरविण्यात आलेले उमेदवार,भोसे

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बोगसभोसे ग्रामपंचायत निवडणूकमंगळवेढा

संबंधित बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
Next Post
परिचारकांची शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी आणि उमेश परिचारकांची राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा?

परिचारकांची शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी आणि उमेश परिचारकांची राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा?

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..