mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा अतिवृष्टी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची! पुढील भरपाई? जाणून घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 3, 2020
in सोलापूर
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

सोलापुर जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला दोन हजार 180 कोटींची मदत मिळाली. त्यातील 90 टक्‍क्‍यांहून मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे अहवाल सरकारला सादर झाले आहेत.

मात्र, ही मदत ऑक्‍टोबरपुरती मर्यादित नसून जून ते ऑक्‍टोबरपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई असल्याची बाब समोर आली आहे. आता अनेकांनी मदत न मिळाल्याच्या तक्रारी तलाठ्यांकडे केल्या आहेत.

परतीच्या पावसातील नुकसानग्रस्तांना चार हजार 895 कोटींची मदत मिळावी, असे प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य मंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली.

त्यानंतर सरकारने दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. मात्र, त्यात शेतीसाठी अवघे 2 हजार 180 कोटी 54 लाख रुपयांचीच मदत मिळाली.

दिवाळीपूर्वी नव्हे तर आता त्याचे वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, अनेक तालुक्‍यांमध्ये 100 टक्‍के मदतीचे वाटप झाल्याचे संबंधित जिल्हा प्रशासनाने अहवालात नमूद केले आहे.

तर ही मदत ऑक्‍टोबरमधील नुकसानीची नसून जून ते ऑक्‍टोबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद करण्यात आल्याने आश्‍यर्च व्यक्‍त होत आहे.

आक्रमक शेतकऱ्यांना गावातील तलाठी दुसऱ्या हप्त्यात मदत मिळेल, असे आश्‍वासन देऊ लागले आहेत. मात्र, याबाबत मदत व पुनवर्सन विभागातील अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवत सरकारकडे बोट दाखविले आहे.

सोलापूर जिल्ह्याचे 99.25 टक्‍के वाटप

सोलापुरातील दोन लाख 66 हजार 786 शेतकऱ्यांसाठी 984 कोटींची मदत मिळावी, असा प्रस्ताव पाठविला. त्यानुसार सरकारकडून सोलापूरसाठी 250 कोटी 71 लाख 83 हजार रुपये मिळाले. आता करमाळा, सांगोला व माळशिरस तालुक्‍यातील नुकसानग्रस्तांना शंभर टक्‍के मदतीचे वाटप झाले आहे.

तर बार्शी, अक्‍कलकोट, माढा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढ्यातील 99 टक्‍क्‍यांहून अधिक शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठविला आहे.

एकूण मदतीपैकी आता एक कोटी 87 लाख 41 हजार रुपयांचे वाटप करायचे असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.(सकाळ)

दुसऱ्या टप्प्यातील मदतीचा आणखी निर्णय नाही

जून ते ऑक्‍टोबर या काळात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत दिली. आता जिल्हानिहाय वाटप झालेल्या रकमेची माहिती मागविण्यात आली आहे.तर दुसऱ्या टप्प्याबाबत सध्यातरी काही निर्णय झालेला नाही.– सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अतिवृष्टीमुळे नुकसानसोलापूर

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 17, 2026
Next Post
राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील त्यांच्यावरही कार्यवाहीची मागणी

राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील त्यांच्यावरही कार्यवाहीची मागणी

ताज्या बातम्या

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 23, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा