टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केल्याची घटना ताजी असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी देखील मंगळवेढ्यात आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे.
साळुंखे त्यांच्यावरही कार्यवाही करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केली.
यामुळे पदवीधर मतदार संघाच्या मतदार संघातील निवडणुकीच्या मतमोजणी पूर्वी परस्परविरोधी तक्रारीमुळे महाविकास आघाडी व भाजप राजकीय दंगल सुरू झाली.
या संदर्भात माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर कार्यवाहीची मागणी शशिकांत चव्हाण यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सुरू असताना माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी शहरातील भूत क्रमांक 394,395,396 मतदान सुरू असतानाच स्थानिक पदाधिकारी समवेत आतमध्ये जाऊन बॅलेट पेपर चेक केले आणि आतमध्ये फिरून आले.
त्यांचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात नमूद केली आहे.
यासंदर्भात माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज