mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा संपावर जाणार!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 26, 2020
in सोलापूर
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या 14 जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत, तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी संपावर जाईल, असा इशारा किसान क्रांती चळवळीचे समन्वयक धनंजय जाधव यांनी दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी किसान क्रांती चळवळीने संप पुकारून तत्कालीन भाजपच्या सरकारला वाकवून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या होत्या; पण त्या मागण्या आश्‍वासनापुरत्याच राहिल्या असून अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

याबाबत आता जनजागृती करण्यासाठी क्रांतीचे समन्वयक धनंजय जाधव हे शेतकरी जागृती मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताहेत. आज ते करमाळा येथे आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

या वेळी धनंजय जाधव म्हणाले, की जनतेला स्वस्त अन्नधान्य व भाजीपाला मिळावा असे सरकारला वाटते; मात्र दुसऱ्या बाजूला शेतकरी भरडला जात आहे. महागाई कमी करण्याच्या नादात शेतकऱ्यांचे प्रपंच उद्‌ध्वस्त केले जात असतील तर आता शेतकरी गप्प बसणार नाही.

भाजपच्या काळात कर्जमाफी योजनेतील अजून 40 टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. विद्यमान सरकारने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली पण ती पन्नास टक्के शेतकऱ्यांना दिली व दोन लाखांच्या पुढील शेतकरी थकीत आहेत. त्यांचा विचार पुढे करू, असे आश्वासन दिले पण अद्याप मोठ्या कर्जदाराला न्याय दिला नाही.

दूध, वीज, हमीभाव या सर्व बाबी शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. नवीन आलेला कृषी कायदा तर शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा आहे. या सर्व निर्णयांमुळे शेतकरी कसा उद्‌ध्वस्त होत आहे याची सविस्तर माहिती आम्ही शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन देत आहोत.

शेवटी 14 जानेवारी रोजी आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. त्यासाठी आता शासनाने संक्रांतीपूर्वी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत; अन्यथा येणारी संक्रांत शासनावर कोसळून सरकार पडेल, असा इशाराही धनंजय जाधव यांनी दिला.

हरित क्रांतीमुळे अन्नधान्य क्षेत्रात संपूर्ण देश स्वावलंबी झाला, मात्र अन्नधान्य निर्माण करणारा शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. फक्त उत्पादनवाढ करणे यासाठी कृषी खाते काम करते,

पण शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला दर मिळण्यासाठी कृषी खाते कुठलेच काम करत नाही, याचे गमक आता शेतकऱ्यांच्या पोराला कळालं असून, आम्ही जर उत्पादनच केलं नाही तर तुम्ही खाणार काय?

शेतकरी आत्महत्या मराठवाडा, विदर्भात होत होत्या, भावी काळात पश्‍चिम महाराष्ट्रात सुद्धा आत्महत्या होतील. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले.

आमच्या चळवळीला कोणी नेता नसून, सर्व शेतकऱ्यांची पोरं या आंदोलनात उतरणार आहोत. ठोस निर्णय झाल्याशिवाय आता शेतकरी माघार घेणार नाही, असे शेवटी धनंजय जाधव यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरीसंप

संबंधित बातम्या

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

June 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
Next Post

मंगळवेढ्यात विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 20, 2026
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..