टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीत तसा ठराव घेण्यात आला. मात्र सोलापुरचे खासदार यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ज्या नागरिकांनी मतं दिल्याने मागील 8 वर्षांपासून हे खासदारकी भूषवत आहेत, त्यांच्या प्रश्नावर हे एवढा वेळ गप्प कसे बसू शकतात, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाहीये.सामाजिक कार्यकर्ते राज सलगर म्हणाले, खासदार महोदय गेल्या तीन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्याही विषयावर बोलायला तयार नाहीत.
माध्यमांनाही बोलत नाहीत. ज्या तालुक्यात त्यांचा जन्म झाला, त्याच तालुक्यातील 28 गावंच कर्नाटकात जायला निघाली आहेत. म्हणजे जन्मभूमी आणि कर्मभूमीलाही तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत.
एकिकडे खासदार म्हणून तुम्ही अपयशी आहात तर दुसरीकडे धर्मगुरू म्हणूनही तुम्ही अपेक्षा पूर्ण करत नाहीयेत, असा आरोप राज सलगर यांनी केला.
सोलापूर जिल्हा तसेच कर्नाटक राज्यात धर्मगुरू म्हणून खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा मोठा भक्तगण आहे. लिंगायत समाजाचे ते धर्मगुरु आहेत.
पण आपल्या गावातील लोकांची त्यांनी साधी भेटही घेतली नाही. हे खासदार महोदयांचं खूप मोठं अपयश असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.(स्रोत:TV9मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज