टीम मंगळवेढा टाईम्स।
गेल्या 18 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रणवीरकुमार साहू या बालकाच्या शोधासाठी प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जनहित शेतकरी संघटनेने मंगळवेढ्यातील दामाजी चौकात रास्ता आज 1 वाजता रोको आंदोलन केले.या आंदोलना दरम्यान वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची फिर्याद मनोजकुमार अमरसिंह साहू (वय ३१ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. अकोला, पो. कारेसरा, ता. साजा, जि. बेनेतरा, राज्य छत्तीसगड, सध्या एमआयडीसी समोर पंढरपूर बायपास रोड मंगळवेढा) यांनी दिली आहे.
दरम्यान, त्यानंतर 18 दिवस उलटूनही तपास लागला नाही. दि.18 नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजता सुमारास शिवाजी पार्क मंगळवेढा येथील बांधकामावर काम करणाऱ्या छत्तीसगड येथील मजुराच्या मुलास अज्ञात व्यक्तीने अपहरण केले.
पोलिसांनी फिर्यादी मनोजकुमार अमरसिंह साहू व इतर साथीदारांच्या मदतीने सर्वत्र शोध सुरू केला. मात्र 18 दिवस उलटूनही रणवीरकुमार सापडला नाही.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावला होता.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.।
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज