टीम मंगळवेढा टाईम्स ।
कपाशी, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीकपद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कपाशी, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांतील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे.
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामात बॅटरी संचालित फवारणी पंपाचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन अर्जातून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.
कृषी यांत्रिकीकरण या टाइलअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज