टीम मंगळवेढा टाईम्स ।
उच्च महाविद्यालयांमधील युवक-युवतीच्या आनंदाचा उत्सव म्हणजे विद्यापीठाचा युवा महोत्सव. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला १ ऑक्टोबरपासून सुरवात होणार आहे. यंदाचा हा महोत्सव वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयात होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी प्रथम सत्र परीक्षेपूर्वी युवा महोत्सव घेतला जातो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, परीक्षेपूर्वी त्यांना कलागुण सादर करता यावेत, हा त्यामागील उद्देश आहे.
युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारणाऱ्या महाविद्यालयास विद्यापीठाकडून १४ लाख रुपये दिले जातात. मागच्या वर्षीपासून ही रक्कम वाढविण्यात आली असून तत्पूर्वी १२ लाख रुपये दिले जात होते.
वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयावर यापूर्वी दोनदा युवा महोत्सव पार पडला आहे. युवा महोत्सवासाठी वाड;मय, लोककला, संगीत, नाट्य, नृत्य व ललित असे सहा प्रकार असतात. सहा कला प्रकारांअंतर्गत एकूण ३९ कला सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते.
लावणी, पथनाट्य व एकांकिका हे कला प्रकार विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आवडीचे असतात. महोत्सवाच्या परीक्षणासाठी बाहेरून पर्यवेक्षक बोलावले जातात. उत्कृष्ट कला सादर करणाऱ्यांमधून गोल्डन गर्ल, गोल्डन बॉय, उत्कृष्ट महाविद्यालय, अशी निवड करून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
नियोजन अंतिम, आता तयारी युवा महोत्सवाची
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली युवा महोत्सवाची तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने आता विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना महोत्सवाच्या तयारी करण्यासंदर्भातील पत्रव्यवहार केला जात आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात महोत्सव होईल. वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयावर यंदाचा महोत्सव होईल. – डॉ. केदारनाथ काळवणे, संचालक, विद्यार्थी विकास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा
विद्यापीठाचे सत्र सुरू होऊन ९० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर परीक्षा घेतली जाते. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होणार आहे. विद्यापीठाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा डिसेंबरमध्ये सुरू होईल. आगामी काही दिवसांत विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.(स्रोत:सकाळ)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज