टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथील गोवर्धन भिवा तरंगे (वय ३८) याने मी औषध पिवून मरणार आहे,असे घरी सांगून घरा बाहेर पडला
त्याने दारूच्या नशेत कोणते तरी विषारी औषध पिवून मंगळवेढा शिवारात तो मृतावस्थेत मोटर सायकलसह मिळून आल्याने त्याची आकस्मात मयत अशी पोलिसांत नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत गोवर्धन तरंगे हा दि.१४ रोजी सकाळी १०.३० वा. बजाज डिस्कव्हर गाडीवर जात असताना तो दारूच्या नशेत होता.
मी औषध पिवून मरणार आहे असे तो म्हणत पत्नी समोरून गेला होता. त्यानंतर तो घरी आलाच नाही. कुटुंबियांनी सर्वत्र नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू तो मिळून आला नाही.
दि.१५ रोजी मंगळवेढा शिवारात खबर देणारे बाळासाहेब तरंगे व त्यांचा भाऊ भाऊसाहेब, गजेंद्र गडदे, कल्याण लवटे असे शोध घेत असताना मयताची डिस्कव्हर गाडी ही कोळेकर यांच्या काळ्या शिवारात मिळून आली.
मयत गोवर्धन हा तिथे मान खाली घालून बसलेल्या अवस्थेत दिसून आला. मयताच्या भावाने त्यास हालवले मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सदर ठिकाणी पोलिसांना बोलावून खात्री केली.
व दारूच्या नशेत विषारी औषध पिवून मयत झाला असावा असे दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक कृष्णा जाधव हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज