टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील ज्ञानदीप विदयालयातून घराकडे सायकलवरून परतत असताना नागणेवाडी येथे एका बिगर नंबरच्या ट्रॅक्टरने
कृष्णा सनतकुमार थिटे (वय.१४ वर्षे) या विदयार्थ्याला जोराची धडक देवून जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गेली अडीच महिने फरार असलेला ट्रॅक्टर चालक उत्तम सरवदे (रा.बीड) याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील मयत कृष्णा थिटे हा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता.
दि.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वा. शाळेतून रेंजर सायकलवरून घरी परत जात असताना नागणेवाडी येथील श्रीजल पाणी फिल्टरच्या समोर ऊसाने भरलेल्या लाल रंगाच्या बिगर नंबरच्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी होवून मयत झाला.
या घटनेनंतर घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालकाने धूम ठोकली होती.ट्रॅक्टर चालक हा ऊस तोड मजूर असल्याचे सांगण्यात आले.
मयताचे वडील सनतकुमार थिटे यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल होवून याचा तपास पोलिस उपनिरिक्षक सौरभ शेटे हे करीत होते.
दरम्यान अडीच महिन्याच्या कालावधीनंतर आरोपी उत्तम सरवदे याला बीडहून ताब्यात घेण्यात तपास अधिकाऱ्यांना यश आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज