टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे शेताचा बांध फोडल्याचा जाब विचारणार्या एका 34 वर्षीय महिलेवर विळयाने हल्ला केल्याप्रकरणी धर्मा कृष्णा घाडगे, महादेव कृष्णा घाडगे, सचिन धर्मा घाडगे या तिघा विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी शकुंतला अभिमान दुधाळ (वय 34) ह्या दि.29 रोजी सकाळी 10 वाजता भोसे गावातील त्यांच्या शेजारी असलेले
वरील आरोपी यांनी वादातील जमिनीमधील बांधावरील गवत कापून खोर्याने बांध फोडून दंड करीत असताना फिर्यादीने हा बांध हद्दीवरचा असून
जमिनीची मोजणी झाल्याशिवाय बांधाला काहीही करायचे नाही असे सांगत असताना आरोपीने शिवीगाळी दमदाटी केली.
यावेळी आवाजाने फिर्यादीचे पती व सासरे सदर ठिकाणी आले. त्यांनीही मोजणी झाल्याशिवाय काही करू नका असे म्हणत असताना आरोपीने फिर्यादीच्या पतीस धक्काबुक्की केली,
यावेळी फिर्यादी भांडण सोडवण्याकरीता मधे गेले असता वरील आरोपीने गवत कापायच्या विळयाने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर विळा मारून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज