mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार नोव्हेंबरमध्ये; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदारांच्या नावांची चर्चा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 31, 2022
in राजकारण, राज्य, सोलापूर
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील चार आमदारांची नावे सध्या आघाडीवर आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यात भाजपचे एवढे आमदार व खासदार विजयी झाले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष या जिल्ह्यावर आहे.

यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी महाराज तर माढा लोकसभेमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही खासदार भाजपचेच विजयी झालेत.

तर पंढरपूर-मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, माळशिरस, हे पाच आमदार भाजपचे तर बार्शीचे आमदार भाजपच्या मदतीने झालेत.

आता भाजपचा डोळा प्रामुख्याने शहर मध्य, माढा, करमाळा व मोहोळ या चार मतदारसंघावर आहे. उमेदवारी वाटपात काही मतदारसंघ शिंदे गटाकडे जातील.

भाजपच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघात भाजपचाच आमदार विजयी व्हावेत, यासाठी कोणता आमदार स्ट्राँग ठरेल त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल, असेही बोलले जात आहे.

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मंगळवेढा-पंढरपूरात भाजपने समाधान आवताडे यांच्या रूपाने विजय मिळवला व त्यानंतर राजकीय गणिते बदलू लागली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली होती.

त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातील नागरिकांना मोठा शब्द दिला होता. त्यामुळे आवताडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, माढा लोकसभा आणि करमाळा, माळशिरस या विधानसभा मतदारसंघात मोहिते-पाटलांचे प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना संधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता यावी आणि ‘शहर मध्य’मधील काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ मिळविण्यासाठी विशेषत: विजयकुमार देशमुख यांना संधी मिळू शकते.

दुसरीकडे सुभाष देशमुख यांचीही ताकद जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेटची संधी मिळू शकते, असेही बोलले जात आहे.

पहिल्या टप्प्यात त्यांना संधी मिळेल, अशी सर्वांनाच आशा होती. पण, जिल्ह्यातील कोणालाच संधी मिळाली नसल्याने आता विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भरघोस यश मिळवून पुढच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार व दोन्ही खासदार पुन्हा विजयी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्याला विस्तारात एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री मिळेल, अशी अपेक्षा जिल्हावाशीयांना आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश शेती दौऱ्यावर जाण्याची संधी; कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे इच्छूक शेतकऱ्यांना आवाहन

August 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठे काय आहेत हे दाखवून देऊ! मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

August 9, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
Next Post
बिरोबा-महालिंगराया गुरु शिष्याची आज हुलजंतीत भेट, लाखो भक्त दाखल; भाविकांच्या माहितीसाठी यात्राशेड उभा

कार्तिकी वारीपेक्षा जास्त भक्तांची संख्या असलेल्या मंगळवेढ्यातील 'महालिंगराया' देवस्थानच्या दानपेटीत जमा झाले 'इतके' लाख

ताज्या बातम्या

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 11, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश शेती दौऱ्यावर जाण्याची संधी; कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे इच्छूक शेतकऱ्यांना आवाहन

August 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा