मंगळवेढा टाईम्स न्युज ।
भिशी लावल्यामुळेच कर्ज झाल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीस चाकूने भोसकून दगडाने मारून खून केला.
मुलास फोन करून बोलवून त्यासही चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी ६:३० दरम्यान नागोबाचीवाडी, ता. बार्शी हद्दीतील घडली. मनीषा अनंत साळुंखे (वय ४४, रा. जावळे प्लॉट एस लॉन्सच्या पाठीमागे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मयताचा मुलगा समर्थ अनंत साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडील अनंत रामचंद्र साळुंखे याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तेजस अनंत साळुंखे (वय २१) असे जखमी असलेल्या इसमाचे नाव आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. २६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान आईवडील घरी नसताना फिर्यादी यास शेजारचे लोक आमची भिशीचे पैसे दे, आमचे पैसे दिले नाहीत तर आम्ही घरातील सामान घेऊन जाऊ,
घराला कुलूप लावून असे म्हणल्यामुळे फिर्यादीने वडिलांना फोन लावून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईवडील घरी आले वडील आईला शिवीगाळ करत होते.
त्यामुळे वडील मारतील या भीतीने आईने मावशीला कौशल्या राऊत यांना घरी सोबतीसाठी बोलावले. परंतु दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ६:३० वाढण्याच्या दरम्यान फिर्यादीची आई मनीषा हिने भिशी लावल्यामुळेच कर्ज झाले.
हा राग मनात धरून आरोपीने पुण्याला जायचे म्हणून आई व भाऊ तेजस याला मोटरसायकलवर बसवू नागोबाचीवाडी हद्दीतील आमच्या शेतात नेऊन आईच्या गळ्याला टॉवेलने आवळून उजव्या कानाच्या खाली मानेवर कानाच्या पाठीमागील डाव्या बाजूस जबड्यावर धारदार चाकूने भोसकून तोंडावर डोळ्यावर दगडाने मारले.
यात फिर्यादीची आई जागीच ठार झाली. तसेच माझा भाऊ तेजस यास गळ्यावर पोटावर डाव्या बाजूस धारदार चाकूने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे हे करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज