मंगळवेढा टाईम्स न्युज ।
आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधून घरी आलेल्या दोन लहान मुलींना खाऊचे पैसे देऊन बाहेर पाठवले व एका वृद्धाने पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा नको त्या ठिकाणी हात लावून विनयभंग केला. ही घटना २२ डिसेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास सांगोला तालुक्यात घडली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, पोलिसांनी सुभाष जगधने (वय ६५) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला.
फिर्यादी २२ डिसेंबर रोजी सकाळी ७:३०च्या सुमारास नजीकच्या गावात शेती मजुरीच्या कामावर गेल्या होत्या. तर फिर्यादीचे पती लग्न समारंभानिमित्त परगावी गेले होते.
त्यामुळे फिर्यादीच्या तिन्ही मुली घरीच होत्या. दरम्यान, दुपारी २ च्या सुमारास वृद्धाने दोन लहान मुलींना पैसे देऊन गावातील दुकानात खाऊ आणण्यासाठी पाठवले.
त्यावेळी ५वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरी थांबली असता मुलीला जवळ घेऊन अंगावरून हात फिरवून नको त्या ठिकाणी हात लावून तिच्याशी गैरवर्तन केल्याने घाबरून मुलीने तिच्या घराकडे पळ काढला.
सायंकाळी ७:३० वाजता फिर्यादी घरी आल्यानंतर घडला प्रकार मुलीने आईला रडतच सांगितला. त्यानंतर पती-पत्नीने पोलिस स्टेशनला येऊन वृद्ध व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल बजरंग बोराटे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज