टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील जगदाळे गल्ली येथून 45 वर्षीय तरूण पती राहत्या घरातून बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसात केली असून पोलिस त्या बेपत्ता तरूणाचा कसून शोध घेत आहेत.
यातील खबर देणारे अर्चना सतीश पडवळे (वय 29) ह्या दि.13 रोजी सकाळी घरातील काम उरकून शेतातील मजूरीच्या कामासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी घरातील सर्व सदस्य तसेच त्यांचे पती सतीश पडवळे हेही घरात होते.सायंकाळी 5.30 वा. यातील खबर देणार्या या घरी परतल्यानंतर त्यांचे पती घरामध्ये दिसले नाहीत.
त्यावेळी त्यांनी मुलीस पप्पा कोठे गेलेत असे विचारले असता सकाळी 8.30 वा. घरातून गेले आहेत, ते आणखी परत आले नाही असे सांगितले.
तदनंतर पत्नीने पतीची रात्रभर वाट पाहून आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला.
नातेवाईकांकडे फोन करून खात्री करून घेतली असता ते मिळून आले नाहीत.ते कोणास काही न सांगता घरातून बेपत्ता झाले असल्याचे खबरीमध्ये म्हटले आहे.
त्यांचे वर्णन उंची 6 फुट,रंग सावळा,अंगाने सडपातळ,पांढरे रंगाचा शर्ट व निळया रंगाची जीन पँट परिधान केलेली असून
अशा वर्णनाची व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज