टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे वाळूच्या पकडलेल्या वाहनाजवळ आपले शासकीय काम करीत असताना या वाहनामध्ये तू का थांबला आहे असे म्हणून
गच्चीला पकडून शिवीगाळी करून मध्ये आला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून वाळुचे वाहन पळवून नेल्याप्रकरणी
दिगंबर तानाजी जाधव व तीन अज्ञात इसमाविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणणे व वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्रानी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी तथा कोतवाल सुरेश शिंदे (रा.बावची) हे दुपारी 3.30 वाजता मरवडे येथील आनंदा घुले यांच्या शेतात
वाळूचा आयशर टेम्पो क्रमांक के.एल.12 बी 991 हा उभा असल्याने त्या वाहनात कोतवाल तथा फिर्यादी झोपले होते.
वरील आरोपीने येवून फिर्यादी शासकीय काम करीत असताना त्यांना उठवून तू कसा काय या वाहनामध्ये थांबला आहे, बाहेर हो असे म्हणून गच्चीला पकडून ढकलून देवून फिर्यादीचा मोबाईल व वाहन घेवून पोबारा केला.
सदरचे वाहन लांब गेल्यावर आरोपीनी मोबाईल पुन्हा फिर्यादीस आणून दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलिस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
दरम्यान वाळुचे वाहन पळून गेले की सोडून दिले याबाबत मात्र मरवडे व बावची परिसरात खमंग चर्चा ऐकावयास मिळत असल्याने पोलिसानी या घटनेच्या मुळाशी जावून सत्य उजेडात आणावे अशी मागणी नागरिकामधून केली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज