mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गाफिल राहू नका! ऐन दिवाळीत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात एन्ट्री; किती घातक वाचा…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 24, 2022
in राज्य
चिंता वाढली! राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोना संसर्ग संपला असं वाटत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने राज्यात एन्ट्री केली आहे.

महाराष्ट्रासह केरळातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असल्याने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मुंबईत गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 150 रुग्ण सापडले आहेत. गेल्या पाच दिवसात सरासरी दहा लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

गुरूवारी राज्यात 477 रुग्ण सापडले. त्यातील 178 रुग्ण मुंबईतील होते. महाराष्ट्रात कोव्हिडचा बी बी सब-व्हेरिएंट (XBB sub variant) चाही रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

दिवाळीच्या गर्दीमुळे दिवाळी आधी आणि नंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हिवाळ्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचं मुंबईतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

मुंबईत एन्फ्ल्यूएंजा सारख्या आजारांवर लक्ष ठेवून असल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे. कारण हा संसर्गजन्य रोग आहे. नुसत्या शिंकण्यानेही हा आजार पसरतो. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.

काही लोक कोरोना संक्रमित असू शकतात. त्यांच्यामुळेही हा आजार पसरू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कोव्हिड झालेल्यांच्या संख्येतील वाढ आणि घट गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. जोपर्यंत नवा व्हेरिएंट येत नाही. तोपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग कमी राहील.

कोरोनामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. पण सावध राहिलं पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावला पाहिजे.

जर कुटुंबात कोणी आजारी असेल तर त्याला मास्क लावायला सांगा. कुणाची इम्युनिटी कमी असेल तरीही त्याला मास्क लावायला सांगा, असं कोव्हिड टास्क फोर्सचे माजी सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं. डॉ. पंडित यांनी आजतकशी संवाद साधला होता.

ऑमिक्रॉन स्पॉन नावाचा एक नवीन व्हेरिएंट आहे. तांत्रिकदृष्ट्या बीए 5.1.7 आणि बीएफ 7 नाव असं त्याला देण्यात आलं आहे. हा व्हेरिएंट पहिल्यांदा चीनच्या मंगोलियात आढळला.

गेल्या दोन आठवड्यात अमेरिकेत हा व्हेरिएंट 0.8 ते 1.7 टक्क्यांनी वाढला आहे. यूके, जर्मनी आणि फ्रान्स सारख्या यूरोपीय देशात या व्हेरिएंटची जवळपास 15 ते 25 टक्के प्रकरणं दिसून आली आहेत, अशी माहिती फरिदाबादच्या डॉक्टर चारु दत्त आरोडा यांनी सांगितलं.

या व्हेरिएंटची लक्षणेही कोव्हिड 19 सारखी आहेत. अंगदुखी हे या व्हेरिएंटचे मुख्य लक्षण आहे. त्याशिवाय खोकला, सर्दी या नव्या व्हेरिएंटचे सब लक्षणे आहेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.(स्रोत;TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना उद्रेक

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

June 9, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
Next Post
चिंताजनक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील जनावरात लंपीची लक्षणे? पशुधन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने पाठवले

कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांसह 7 जनावरे हस्तगत; मंगळवेढ्यातील दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
मंगळवेढ्यात जुगार खेळणाऱ्या 17 जणांसह 21 जण पॉझिटिव्ह; रुग्णांची प्रशासनासोबत हुज्जत

​’डायल ११२’ वर एक कॉल अन् खेळ खलास! मंगळवेढ्यात चालणाऱ्या जुगारावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; ७ आरोपींसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

June 14, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा