मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना शब्द देण्यात आलेला होता. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतील.
मात्र, प्रशांत परिचारक मोठे नेते आहेत. या भागात त्यांचं मोठं नाव आहे. प्रशांत परिचारकांना जर शब्द दिला असेल तर तो तंतोतंत पाळला जाईल, असेही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आकसबुद्धीने आम्ही कोणावरही कारवाई करणार नाही. पण आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संदर्भात काही तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले तरच कारवाई केली जाईल.
मात्र विनाकारण कोणावरही कारवाई केली जाणार नाही, असे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. महाजनांच्या स्पष्टीकरणानंतर मोहिते पाटलांवर कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सहकुटुंब विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासंदर्भात विचारण्यात आले, त्या वेळी त्यांनी तक्रारींमध्ये कोणी दोषी आढळले तरच कारवाई करण्यात येईल; अन्यथा कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.
मंत्री महाजन म्हणाले, कोणी चुका केल्या असतील, अथवा कुठे गैरव्यवहार केलेला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. मात्र सरकार आकसबुद्धीने कुठलीही कारवाई करणार नाही. मात्र गैरव्यवहार झालेला असेल तर निश्चितपणे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
रणजितसिंह मोहिते पाटलांविरोधात राम सातपुते आक्रमक
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याची तक्रार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासंदर्भात पक्षाकडे करण्यात आली आहे. माजी आमदार राम सातपुते हे मोहिते पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यांनी मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न होता. मात्र महाजनांच्या वक्तव्यानंतर भाजपची रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत नरमाईची भूमिका दिसून येत आहे.
महायुतीच्या आमदारांमध्ये नाराजी
महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे बहुमत मिळाले आहे, त्यामुळे भाजपसह तीनही पक्षांतील अनेक आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र इच्छुकांची संख्या आणि मंत्रिपदे पाहता सर्वांची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत, त्यामुळे मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीच्या काही आमदारांमध्ये नाराजीची भावना आहे, अशी कबुलीच मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज