टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्नावर सलगर खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी ग्रामविकास खात्याकडे पाठवले असल्याची माहिती व्हनवटे यांनी दिली आहे.
सोलापुर हा राज्यातील एक महत्वाचा जिल्हा शेती, सहकार, वस्त्रोद्योग, साखर कारखानदारी या क्षेत्रात अग्रेसर असणारा असून प्रलंबित प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ग्रामविकास खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
नागराज व्हनवटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापुर जिल्हयात उद्योगाची संख्या, रोजगाराची संख्या मर्यादीत असल्याने जिल्हातील तरूण बाहेरच्या शहारांवर अवलंबुन असतो .
सोलापुर परीसरात सध्या चिंचोली एम.आय.डी.सी., अक्कलकोट रोड एम. आय. डी. सी. आणि होटगीरोड औद्योगिक वसाहत आहे. इथले उद्योग वाढवण्यासाठी आणखी एक हायटेक एम आय डी. सी. ची गरज आहे.
सोलापुर हा शेतीवर अवलंबुन राहणारा कृषीपुरक व्यवसाय करणारा जिल्हा आहे. ४० ते ४२ साखर कारखान्यांमुळे जिल्हयाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र साखर कारखान्यांच्या पलीकडे जाऊन कृषी प्रक्रिया उद्योगांवर भर देण्याची गरज आहे. जिल्हातील अनेक तालुकयात शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादन करीत आहे. सोलापुर जिल्हातील मंगळवेढा तालुकयातील ज्वारी प्रसिध्द आहे.
शेतीमध्ये अधिक अधिक संशोधन व्हावे तसेच कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी यासाठी जिल्हयात स्वतंत्र कृषी विद्यापीठ होणे आवश्यक आहे.
सोलापुर जिल्हयात श्री क्षेत्र पंढरपुर, अककलकोट, हुलजंती सोलपुरातील श्री. सिध्देश्वर महाराज, सोलापुर जवळच तुळजापुर, गाणगापुर येथे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात पंढरपुरच्या चारही वा-यांमध्ये लाखो भाविक असतात.
अककलकोट या ठिकाणी कायम गर्दी असते. निवास व्यवस्था, प्रवास आणि स्थल दर्शन, आणि स्थानिक मालाची विकी अशा अनेक गोष्टीतुन मोठे उत्पन्न मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी सोलापुर धार्मिक पर्यटन केंद म्हणुन दर्जा आपल्या माध्यमातुन मिळावा.
सोलापुर जिल्हयातील ज्या तालुकयामध्ये १०० बेड चे उपजिल्हा रूग्णालय उभारले नसतील तर ते उभारण्यात यावे. सोलापुर जिल्हयातील ज्या तालुकयामध्ये सांस्कृतीक भवन/नाट्यगृह नाही त्या ठिकाणी सांस्कृतीक भवन/नाट्यगृह बांधण्यात यावे .
सोलापुर जिल्हयात ग्रामिण भाग जास्त असल्याने काही तालुकयातील काही दुष्काळी भाग अजुनही सोई सुविधांपासुन वंचीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज