पंढरपूर। राजेंद्र फुगारे
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या दोन कर्मचाऱ्यांचा कारखाना स्थळावरील अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच,
आज सकाळच्या सुमारास विठ्ठल कारखान्याचे शरद घाडगे हे कर्मचारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
श्री.विठ्ठल साखर कारखान्याचे कर्मचारी शरद घाडगे यांना व इतर दोन महिलांना आज सकाळच्या सुमारास तहसील कार्यालय जवळ एका अज्ञात वाहने जोराची धडक दिली आहे.
शरद घाडगे हे आपल्या पत्नीला तहसील कार्यालय परिसरामध्ये सोडण्यात गेले असता अपघात झाल्याचे समजते. या अपघातामध्ये शरद घाडगे हे गंभीर जखमी झाल्याचे हे वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे.
कारखाना स्थळावरील बॉयलिंग हाऊस मध्ये काम करत असताना हाऊस स्टीम प्रेशर वॉल फेल होऊन तुटून त्याचा दणका बसल्याने दोन कामगाराच्या मृत्यूचा धक्का ताजा असतानाच
आज पुन्हा एक कारखान्याचा कर्मचारी अपघातामध्ये गंभीर स्वरूपाचा जखमी झाल्याने. कामगारांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज