टीम मंगळवेढा टाईम्स ।
दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांना दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांचेवतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार रविवारी लोककलावंत पै.मजनूभाई शेख स्मृतीगौरव पुरस्कार वितरण सोहळयात प्रदान करण्यात आला.
श्रीरामपूर जि.अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात चित्रपट गीतकार व अभिनेते बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते व शास्त्रज्ञ तथा माजी उपशिक्षण संचालक डॉ.एस.एन.पठाण यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी नाटय व सिनेकलावंत वसुंधरा शर्मा, श्रीरामपूरच्या माजी सभापती डॉ.वंदना मुरकुटे, बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे, माजी पोलिस अधिकारी सुभाष सोनवणे,
शब्दगंधचे संस्थापक सुनिल गोसावी, श्रीरामपूरचे आगार प्रमुख राकेशकुमार शिवदे, जीवनगौरवचे संपादक रामदास वाघमारे,
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रजाकभाई शेख यांचेसह मंगळवेढयाचे लहू ढगे, संतोष ढावरे, दत्तात्रय डांगे, पोपट मोरे, सोलापूरचे रोहन नंदाने, देवा चिंचोळीकर आदि उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज