पंढरपूर : राजेंद्र फुगारे
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उत्पादन विभागात व्हॉल्व्ह बसवताना नट तुटल्याने स्पिंडल शाफ्टचा धक्का बसून १५ फुटांवरून खाली कोसळल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला.
रविवारी सकाळी ही दुर्घटना झाली. सदाशिव सुधाकर चौगुले (वय २८, रा. सांगवी, ता. पंढरपूर), सोमनाथ मारुती नरसाळे (वय २५, रा. जळोली, ता. पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.
रविवारी पहाटे ४ ते दुपारी १२ या पाळीत गाळप सुरू असताना उत्पादन विभागात सोमनाथ नरसाळे, सुधाकर चौगुले व्हॉल्व्ह बसवत होते. व्हॉल्व्ह जोरात आवळला गेल्याने त्याचे नट तुटले.
त्यामुळे स्पिंडल शाफ्ट तुटून त्याचा धक्का लागल्याने दोघेही १५ फुटांवरून खाली कोसळले. चौगुलेआणि नरसाळे गंभीर जखमी झाले. त्यांना पंढरपुरातील लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचारांपूर्वीच चौगुलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नरसाळे याला सोलापूरला हलवण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री साडेआठच्या दरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, कार्यकारी संचालक गायकवाड यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज