टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा ग्रामीण भागात मंगळवारी केलेल्या तपासणीत १२ कोविड रुग्ण आढळून आले असून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मंगळवारी केलेल्या तपासणीत घरनिकी ६ , उचेठाण १ , हाजापूर ३ , डिकसळ २ असे एकूण १२ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत.
यामध्ये मरवडे प्रा. केंद्र ४६९, आंधळगांव प्रा.केंद्र ३१२, बोराळे प्रा.केंद्र २९४, भोसे प्रा.केंद्र १९८, सलगर प्रा.केंद्र २५७ , फिरते पथक १६१ असे एकूण १६ ९ १ जणांचे टेस्टींग करण्यात आले होते.
यामध्ये १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.कोरोना हा संसर्गजन्य आजार अदयापही हाटला नाही सध्या सणांचे दिवस असल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठात गर्दी वाढत असल्याचे चित्र असून अनेक नागरिक तोंडाला मास्क न लावता तसेच व्ययसायिक कोरोना नियमांचे न करता दुकानासमोर गर्दी करून कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाला रोखणे ही एकटया प्रशासनाची जबाबदारी नसून सर्वांची जबाबदारी असल्याने प्रत्येक नागरिकाने याची खबरदारी घेत घराच्या बाहेर पडताना तोंडाला मास्क लावून गरज असल्यासच बाहेर पडावे, व्यसायिकांनी दुकानासमोर ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स राहिल याची काळजी घ्यावी.
मंगळवेढयालगत पंढरपूर व सांगोला हे तालुके असल्याने नागरिकांची आवक जावक होत असल्याने संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. चालू महिन्यात गणेशोत्सव, गौरी पूजन, नवरात्र व दिपावली असे मोठे सण तोंडावर असल्याने नागरिकांनी याची दक्षता घ्यावी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज