टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथील अरूण दगडू आसबे (वय ५०) याने दारूच्या नशेत टू फोर डी हे विषारी किटकनाशक पिल्याने बेशुध्द अवस्थेत उपचारासाठी सोलापूर येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत अरूण आसबे याने दि .१२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वा.राहते घरी दारूच्या नशेत टु फोर डी हे विषारी औषध पिल्याने
तो बेशुध्द झाला असताना त्याला भगवंत आसबे याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान तो मयत झाला असल्याची खबर डॉ.भूषण झनक यांनी पोलिसांत दिली आहे.अधिक तपास पोलिस हवालदार दयानंद हेंबाडे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज