टीम मंगळवेढा टाईम्स ।
टिपर खरेदी करून बँकेतून ‘आरटीजीएस’ खरेदी केल्याचा खोटा मेसेज दाखवून ११ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आकाश तुकाराम सारोळकर (वय ३१, रा. संतोष नगर, बाळे) यांना स्वतःच्या मालकीचा टिपर विक्री करावयाचा होता. तेव्हा त्यांना ओळखीच्या दोघांनी संपर्क साधला.
ग्रे रंगाचा टिपर (डब्लूबी-१७ ०७५०) खरेदी करण्याचे ठरले. खरेदीसाठी ११ लाख ३० हजार रुपयांची रक्कम ठरली, त्यानंतर विश्वास संपादन करून बँकेतून कर्ज घेण्याचे ठरले.
व्यवहारातील रकमेपैकी १० लाख ३० हजार रुपये एचडीएफसी बँकेत ‘आरटीजीएस’ केलेला मेसेज आकाश सारोळकर यांना दाखविला. मॅसेज दाखवून ११ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
मेसेज खोटा असल्याचे लक्षात आल्यानंतर आकाश सारोळकर यांनी दोघांना पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांना उचलून नेऊन मारहाण करून हातपाय तोडण्याची धमकी दिली.
परत गावाकडे आलात तर तुम्हाला जिवे ठारवमारून टाकू अशी धमकी दिल्याची फिर्याद आकाश सारोळकर यांनी दिली.
फिर्यादीवरून पोपट दत्तात्रय इंगळे, किशोर राजे गाडे (रा. जाधव वस्ती, वाफेगाव ता. माळशिरस) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हा प्रकार ११ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान घडल्याने त्यांच्यावर भादंवि कलम ४२०, ४०३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तपास हवालदार चुंगे करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज