टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील श्री संत दामाजीनगर येथे दोन महिला व सतरा वर्षीय मुलगा, असे तीन डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळले आहेत. महिन्यांपूर्वी कारखाना रोडलगत असलेल्या कॉलनीतही डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळले होते.
दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी रविवारी या परिसरात डेंग्यूला अटकाव करण्यासाठी औषध फवारणी केली, तसेच नागरिकांनी कोरडा दिवस पाळला.
डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी येथील ग्रामपंचायत सरपंच जमीर सुतार, सदस्य आण्णासाहेब आसबे, लक्ष्मण गायकवाड यांनी तहसीलदार स्वप्नील रावडे
व गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या गंभीर आजाराबाबत माहिती दिली. तसेच प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी केली.
कोरडा दिन पाळण्यासाठी दिल्या सूचना
बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.शेख, आरोग्य सेवक विठ्ठल क्षीरसागर, ग्रामसेवक मोरे, अंगणवाडी सेविका ज्योती गायकवाड, आशा वर्कर जयश्री मस्के,
स्वाती घोडके, मदतनीस उज्ज्वला गावकरे, ग्रा. पं. कर्मचारी नरेश धनवे, वसीम मुजावर, पवार आदी पथकाने घरोघरी भेटी देऊन कोरडा दिन पाळण्यासाठी सूचना दिल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज