टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात शिर्के मल्टीस्पेशालिटी येथे आज शनिवार दि.31 डिसेंबर रोजी मोफत जयपूर फुट व कृत्रिम हात बसवणे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
आज दि.31 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जयपूर फूट व कृत्रिम हात बसवण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने जयपूर फूट व कृत्रिम हात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ता. 31 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत आयोजित केले असून हे शिबिर मोफत आहे, अशी माहिती डॉ.शरद शिर्के यांनी दिली.
शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी आधार कार्ड घेऊन येणे व पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. या शिबिरासाठी मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांनी शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 9423333365 अथवा 8956650654 या नंबवर
संपर्क साधावा, प्रहार संघटनेचे अध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रहार अपंग क्रांती जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, शकिल खाटिक, रोहिदास कांबळे यांनी आवाहन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज