टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर येथील सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची आत रोज नोंद होईल. संबंधित नागरिकाचे नाव, पत्ता अन् कामाचे स्वरूप यासंबंधी माहिती नोंदवहीत लिहिल्यानंतरच नागरिकांना प्रवेश मिळणार आहे.
याबाबत सूचना दिल्या आहेत. याची लवकरच अंमलबजावणी होईल, अशी माहिती तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली.
काही व्यक्ती काम नसताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फिरतात. चकरा मारत असतात. तसेच ज्या कामासाठी नागरिक कार्यालयांमध्ये येतात, त्याचे काम झाले आहे की नाही, नसेल तर कशासाठी काम इतक्या दिवसांपासून प्रलंबित आहे,
कोणत्या विभागात काम प्रलंबित आहे, याची माहिती नोंदवहीद्वारे मिळणार आहे. एकाच कामासाठी नागरिकांना वारंवार येण्याची आवश्यकता पडू नये, याची काळजी यापुढे घेतली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार आता कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांची नोंद राहणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी नोंदवही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
विशेष म्हणजे, सात दिवसांनंतर आलेल्या नागरिकांची संख्या तसेच त्यांच्या कामाचे स्वरूप आणि कामाचे पुढे काय झाले,
यासंदर्भात अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज