मंगळवेढा टाईम्स न्यूज।
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये महिन्याभरापूर्वी एका 13 वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली होती.
त्यानंतर रविवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पंढरपूर शहरातील एका 28 वर्षीय तरुणीवर अॅसिड झाला. वैष्णवी भागवत असे तरुणीचे नाव असून तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली असता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

अहिल्यानगरनंतर पढरपूरमध्ये तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याने पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. सदर घटना घडलेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करण्यात आली. तसेच पीडित तरुणीचे जबाब नोंदवले गेले.

मात्र, तिने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली न आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असताना, अखेर त्या मुलीने स्वतःच हा बनाव रचल्याची कबुली दिली.

बाथरूम साफ करण्यासाठी प्रत्येक घरात वापरण्यात येणारे 60 रुपयांचे ॲसिड तरुणीने दुकानातून विकत घेतले होते. त्यानंतर सदर तरुणी सीसीटीव्ही आणि रहदारी नसलेल्या ठिकाणी गेली आणि तिने तिच्या उजव्या बाजुच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले.

याप्रकरणी पंढरपुरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सांगितले की, तरुणीने स्वतःवरच ॲसिड ओतून घेतल्याची कबुली तिच्या आईसमोर दिली आहे. त्यामुळे आता तरुणीने ज्या दुकानातून ॲसिड खरेदी केले, त्या दुकानाची तपासणी आम्ही करत आहोत, असेही प्रशांत डगळे यांनी सांगितले.

धक्कादायक कारण आले समोर
सदर तरुणीची प्रकृती स्थिर असून तिच्या डोळ्यात गेलेलं ॲसिड डॉक्टरांनी काढलं आहे. यानंतर पोलिसांनी निर्भया पथकाच्या पीएसआय, पिडीतेची आई आणि रूग्णालयातील डॉक्टरांसमोर तरूणीचा व्हिडीओच्या माध्यमातून जबाब नोंदवून घेतला.
तरुणीने सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून मी लिव्हर आणि इतर आजाराने त्रस्त होती. तसेच अनेक वेगवेगळ्या डॉक्टरांकडून मी उपाचर घेतले. मात्र घरातील लोकांचे टोमणे आणि इतर गोष्टींना मी कंटाळली होती. त्यामुळे हे पाऊल उचललेल. सदर तरुणीच्या आईने देखील यावर सहमती दर्शवली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










