mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पाणीदार सरपंच! स्वखर्चातून विहीर खोदून सरपंचांनी भागविली संपूर्ण गावाची तहान; शासकीय निधीची वाट न पाहता मंगळवेढ्याच्या ‘या’ गावच्या सरपंचांचा आदर्श

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 24, 2026
in मंगळवेढा
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​टीम मंगळवेढा टाईम्स |

राजकारणात केवळ आश्वासनांचा पाऊस पडत असताना, मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी येथे मात्र एका लोकप्रतिनिधीने कृतीतून नवा आदर्श घालून दिला आहे. गावचे सरपंच दत्तात्रय माने यांनी स्वखर्चातून विहीर खोदून गावाला पाणीटंचाईच्या छायेतून बाहेर काढले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जुनोनीकरांची वर्षानुवर्षांची पाण्यासाठीची पायपीट थांबली असून संपूर्ण तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.

जुनोनी गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. विहिरी कोरड्या पडल्या होत्या, तर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती.

महिलांना आणि शेतकऱ्यांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सरपंच दत्तात्रय माने यांनी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला.

स्वतःच्या खर्चातून विहीर पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अल्पावधीतच काम पूर्ण केले. या विहिरीमुळे गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले असून अनेक घरांची तहान भागली आहे. ग्रामस्थांनी माने यांच्या या कार्याचे मनापासून स्वागत केले आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात की, अशा प्रकारे स्वखर्चातून संपूर्ण गावासाठी पाणीपुरवठा करण्याची घटना अत्यंत दुर्मिळ आहे. तर महिलांनीही दिलासा व्यक्त करत सांगितले की, आता पाण्यासाठी होणारी रोजची धावपळ थांबली आहे.

या उपक्रमामुळे केवळ पाणीटंचाईच दूर झाली नाही, तर ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधींनी कशी जबाबदारी घ्यावी याचेही उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वत्र सरपंच दत्तात्रय माने यांच्या कार्याची चर्चा होत असून त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले जात आहे.

प्रशासनानेही या कार्याची दखल घेऊन अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी सरपंचांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार करण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळणे ही माझी जबाबदारी

गावातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी मिळणे ही माझी जबाबदारी आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी पाहून मी हा निर्णय घेतला. गावकऱ्यांची तहान भागवणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.-दत्तात्रय माने, सरपंच, जुनोनी

धरण उशाला अन् कोरड घशाला

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा या योजनेतुन मंगळवेढा तालुक्यातील तब्बल ४० गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे या योजनेचे पाणी वितरण केंद्र जुनोनी गावातच आहे.

मात्र, विडंबन म्हणजे या योजनेचा गावालाच आजपर्यंत कोणताही फायदा झालेला नाही. ग्रामस्थांच्या मते, गावाच्या हद्दीतूनच पाणीपुरवठा होत असतानाही जुनोनीकरांना पाण्याचा थेंबही मिळत नाही. त्यामुळे “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी परिस्थिती गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झाली आहे.

सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

​सरपंचांच्या या कार्याची दखल आता प्रशासकीय स्तरावरही घेतली जात आहे. जुनोनीतील ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी एकत्र येत दत्तात्रय माने यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, लवकरच गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

​जुनोनीच्या या ‘पाणीदार’ सरपंचाने खऱ्या अर्थाने लोकसेवेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सरपंच दत्तात्रय माने

संबंधित बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
Next Post
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; 'या' लोकांना होणार मोठा फायदा

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा