टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी):
साठे नगर, मंगळवेढा येथील ‘साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ’ यांच्या वतीने सन २०२६ च्या जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
अध्यक्ष जनार्दन भिवा अवघडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि. ०१ ऑगस्ट आणि रविवार दि. ०२ ऑगस्ट २०२६ या दोन दिवसांत विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

शनिवार १ ऑगस्टचे कार्यक्रम:
सकाळी १०:३० वा. –मूर्ती पूजन:
आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊंच्या मूर्तीचे पूजन होईल. यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनंदा आवताडे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील.

सकाळी ११:०० वा. – जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा:
माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शुभहस्ते आणि ‘धनश्री परिवार’चे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

पुरस्कारार्थी: माजी सैनिक संघटना (मंगळवेढा), श्री. नागेश बनकर (पोलीस उपनिरीक्षक), डॉ. प्रदिप गोडसे, श्री. प्रमोद बिनवडे (पत्रकार), श्री. विश्वंभर काळे (प्राचार्य), श्री. लक्ष्मण मस्के (अभियंता), श्री. ब्रम्हदेव वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते), सौ. हौसाबाई नाना अवघडे (सफाई कामगार), श्री. पोपट रामचंद्र लोंढे (बागायतदार), श्री. धोंडीराम दादा सासवरे (शाहीर), श्री. गजेंद्र गेणा कांबळे (ज्येष्ठ नागरिक) आणि आशाताई पाटील (रत्नागिरी) यांचा गौरव करण्यात येणार आहे.

दुपारी ११:३० वा. – शैक्षणिक साहित्य वाटप:
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम यांच्या शुभहस्ते व उद्योजक वैभव नागणे यांच्या अध्यक्षतेखाली गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येईल.

शनिवार सायंकाळी ७ वा. – प्रतिमेचे पूजन:
पहिले पूजन: भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल (दादा) सावंत यांच्या शुभहस्ते व रतनचंद शहा बँकेचे चेअरमन मा. शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. तर उद्योजक राहुल ताड व व्हा.चेअरमन तानाजी खरात हे उपस्थित राहणार आहेत.
रविवार दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पूजन:
पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांच्या शुभहस्ते व बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा कोमलताई ढोबळे-साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमेचे पूजन संपन्न होईल.
रविवार दुपारी ३:०० वा. – भव्य मिरवणूक (मुख्य आकर्षण):
मंगळवेढा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या शुभहस्ते, महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरसेवक सोमनाथ आवताडे व सांगोला नगरपालिका गटनेते पप्पू धनवजीर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणुकीचा शुभारंभ होईल.
मिरवणुकीचे मुख्य आकर्षण:
सुरसंगम बँजो, फुलचिंचोली
DJ पुणे दरबार बँड, कराड
विद्युत मल्टीस्टेटतर्फे आकर्षक लाईट चिपळून देखावा असणार आहे.
सर्व नागरिकांनी व समाजबांधवानी सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












