टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील पौट येथील एक कुटूंबिय औषधोपचार करण्यासाठी दवाखान्यात घराला कुलूप लावून गेल्यानंतर चोरट्याने बंद घराचे कडी-कोयंडा उचकटून
घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 70 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान चोरटे बंद घराला टार्गेट करत असून आत्तापर्यंत चोरट्यांनी अनेक कुलूप बंद घरे फोडल्याने चोरीची मालिका संपता संपेना अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तुकाराम हिप्परकर हे दि.26 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता पौट येथील राहते घरास कुलूप लावून आई मुक्ताबाई हिस उमदी येथील म्हेत्रे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करिता घेवून गेले होते.
दरम्यान फिर्यादी दुपारी 3 वाजता दवाखान्यातून परत पौट येथे आले असता फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जावून पाहिले असता लोखंडी पेटीतील सामान बाहेर फेकून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
चोरट्यांनी 60 हजार रुपये किंमतीचे दीड तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ व 10 हजार रुपय रोख असा एकूण 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पोबारा केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज